सोलापुरात आज सकाळी आठ वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार नवे २९ करोनाबाधित रूग्ण आढळून आले. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या ६५३ इतकी झाली आहे. मृतांचा आकडाही ६४ वर पोहोचला आहे. आतापर्यंत २७९ रूग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज सकाळी आढळून आलेल्या २९ रूग्णांमध्ये २० पुरूषांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यात काल (दि.२६) २०९१ नवे करोना रुग्ण आढळले. तर ९७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाग्रस्तांची महाराष्ट्रातली संख्या ५४ हजार ७५८ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३६ हजार ४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ११६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १६ हजार ९५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

Story img Loader