संजीव कुळकर्णी , लोकसत्ता

नांदेड : नांदेड आणि इतर ठिकाणच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांतील मृत्यूंचे प्रकरण आठवडाभर गाजल्यानंतर या रुग्णालयांच्या मूळ दुखण्यावर उपचार करण्याच्या बाबतीत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ही बाब स्पष्ट झाली.

Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

येथील शासकीय रुग्णालयात २७ सप्टेंबरनंतर शंभराहून अधिक रुग्णांचा झालेला मृत्यू राज्यभर गाजल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह या विभागाचे प्रमुख अधिकारी भेट देऊन गेले. विरोधी पक्षनेत्यांचा दौरा झाला. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी येथील स्थितीचा आढावा मागील आठवडय़ातही घेतला होता. पण वरील रुग्णालयातील वाढीव ५८० रुग्णखाटांच्या व्यवस्थेला मान्यता देऊन त्या प्रमाणात इतर व्यवस्था करण्याची मागणी फार पुढे सरकलेली नाही, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> कोयना धरण परिसरात पर्यटन विकासाचा मार्ग  मोकळा; जलाशयसंबंधित कायद्यात बदल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या राज्यातील बहुतांश रुग्णालयांच्या प्रशासनाला वाढीव रुग्णसंख्येचा सामना तुटपुंज्या व्यवस्थांमध्ये करावा लागत आहे. वर्षभरापूर्वी सर्व महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांकडून वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रस्ताव मागविले होते, पण त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे संबंधित मंत्र्यांच्या कार्यालयातून समजले.

नांदेड वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी ५०० रुग्णखाटांच्या प्रमाणात मनुष्यबळ व इतर बाबी मंजूर आहेत. पण या रुग्णालयात मागील काही वर्षांत दुपटीहून जास्त खाटा वाढल्या, तरी त्या प्रमाणात मनुष्यबळ, औषधीपुरवठा आणि साधनसामग्री नाही. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही अशीच स्थिती आहे. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे नांदेडहून सहभागी झाले होते. नांदेडचेच भूमिपुत्र असलेले वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे बैठकीत हजर होते. डॉ. वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही स्वरूपाची थेट घोषणा झालेली नसली, तरी वाढीव रुग्णखाटांना मान्यता आणि त्या प्रमाणात मनुष्यबळ व साधनसामग्री इ. बाबी लवकरच मार्गी लागतील, अशी अपेक्षा डॉ. वाकोडे यांनी व्यक्त केली.