लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : लाडकी बहिण योजनेसंदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. याबाबतची घोषणा त्यांनी याज रायगड जिल्ह्यात केली. विधानसभा निवडणूकीनंतर योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम पुन्हा जमा होण्यास आज पासून सुरुवात झाली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Ladki Bahin Yojana
Maharashtra News LIVE Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
solapur farmer murder
Solapur Crime News : सोन्याच्या हव्यासापायी सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून; मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
Suresh Dhas News
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण; सुरेश धस म्हणाले, “बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे, आका…”
Ambadas Danve On Chhagan Bhujbal
Ambadas Danve : “भुजबळ फडणवीसांना भेटतात, पण अजित पवार भुजबळांना भेटत नाहीत, याचा अर्थ…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Vinod Kambli Diagnosed with Clots in Brain| Vinod Kambli Health Update
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय

विधानसभा निवडणूकीमुळे लाडकी बहिण योजनेच्या लाभाचे वितरण थांबविण्यात आले होते. आचारसंहितेमुळे या योजनेला काही काळ ब्रेक लागला होता. निवडणूक आचारसंहीता उठल्यानंतर लाडकी बहिण योजनेतील लाभाचे वितरण पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहे. १२ लाख ८७ हजार बहिणींच्या खात्त्यात या योजने आंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी आज जमा करण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उर्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी जमा केला जाणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

आणखी वाचा-Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला रायगड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. ३ लाख ४७ हजार महिला या योजनेच्या लाभार्थी ठरल्या. ५३३ अर्ज त्रृटीमुळे फेटाळले गेले. २ हजार २६६ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. जुलै महिन्यापासून या योजनेला सुरूवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात १ लाख लाख ८१ हजार अर्ज प्राप्त झाले होते. दुसऱ्या टप्प्यात १ लाख ६८ हजार प्राप्त झाले. एकूण जिल्ह्यातून ३ लाख ४९ हजार ९२१ जणींनी योजनेसाठी अर्ज भरले होते. यातील ९९ टक्के अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. ३ लाख ४७ हजार ०४८ अर्ज मंजूर करण्यात आले होते.

योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट महिन्यासाठी एकत्रित ३ हजार रुपये, यानंतर सप्टेंबर महिन्यासाठी दिड हजार रुपये, तर आचारसंहीता लागण्यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपयांचे वितरण करण्यात आले. असे तीन टप्प्यात एकूण ७ हजार ५०० रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीमुळे ही योजना आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली होती. आचारसंहितेमुळे लाभार्थ्यांना निधी वितरण थांबविण्यात आले होते. मात्र आता या योजनेतील आचारसंहितेचा अडसर दूर झाला असून लाडक्या बहिणांना सन्मान निधीचे वितरण पुन्हा एकदा सरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने सर्वांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा होणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-प्रक्रिया उद्योगाच्या नावाखाली बँकेची फसवणूक

दरम्यान, आधार प्रमाणिकरण होत नसल्याने अनेक महिला या योजनेच्या लाभा पासून वंचित राहिल्या होत्या. पण आता ज्या महिलांचे आधार प्रमाणीकरण झाले, त्यांनाही लाभा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या…

अलिबाग – ३२ हजार ८८३, मुरुड – १२ हजार ३२८, कर्जत – ३० हजार ५७९, खालापूर – २८ हजार १५४, महाड – २६ हजार १५३, माणगाव – २७ हजार २८३, म्हसळा – ९ हजार ६८८, पनवेल – ६० हजार ५१९, पेण – ३३ हजार ७५९, पोलादपूर – ७ हजार ६५० रोहा -२५ हजार ०२२, श्रीवर्धन – १४ हजार २२६ सुधागड – १० हजार ५९६, तळा – ७ हजार २४५, उरण – २१ हजार ०८६ इतके अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.

Story img Loader