Aaditi Tatkare On Bharat Gogawale : राज्यातील पालकमंत्र्यांची यादी महायुतीच्या सरकारने शनिवारी (१८ जानेवारी) जाहीर केली. मात्र, पालकमंत्री पदाच्या यादीतून काही मंत्र्यांना डावलण्यात आलं. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनाही डावलण्यात आलं. भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. पण रायगडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं. त्यामुळे मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. आता आदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नाराजीवर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ‘आमच्या कोणत्याही सहकार्यांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. पालकमंत्री म्हणून मला जबाबदारी दिलेली असली तरी भरत गोगावले आणि आम्ही समतोल राखून काम करू’, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा