Aditi Tatkare on Cabinet Minister : स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याची चर्चा होती. परंतु, त्यांनी काल (२७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला. सरकार स्थापनेबाबत भाजपाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो मान्य असेल असा कौल एकनाथ शिंदेंनी दिला. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचाही मार्ग आता मोकळा झाला आहे. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या आदिती तटकरे यांनी संवाद साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीचे कार्यकर्ते म्हणून महायुतीच्या नेत्यांनी महायुतीच्या अधिकाअधिक उमेदवार निवडून यावेत याकरता प्रयत्न केले. अजित दादांच्या उमेदवारांसाठी सर्वांनी काम केलं. महायुतीच्या सरकारच्या कालावधीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वात योजना राबवल्या, त्याला कौल आणि भरभरून प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने दिलं. मुख्यमंत्री जे असतील ते वरिष्ठ पातळीवर ठरवले जातील. तिघांच्या नेतृत्त्वात राज्यात निवडणूक लढवली. अमित शाहांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आम्हालाही सूचना होत्या की कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. म्हणून हे यश मिळवू शकलो. महायुती म्हणून राज्य पुढे नेण्याचं काम या तिघांच्या माध्यमातून होणार आहे”, असं आदिती तटकरे म्हणाल्या. मागच्या मंत्रिमंडळात आदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास मंत्रालय होतं.

मला तिघांचंही मार्गदर्शन मिळालं

दरम्यान, या मंत्रि मंडळात तुम्हाला संधी मिळणार का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, जे काय योग्य तो निर्णय पक्षाचे नेतृत्त्वघेत असतात. दीड वर्षे मला जबाबदारी दिली होती. मी काम करत असताना मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकाऱ्यांनी सर्वांत कमी लहान वयाची, महिला आहे म्हणून हि्च्यावर जबाबदारी द्यावी की नाही अशी भावना जाणवली नाही. फार कमी मंत्रि असतात की तिघांचंही पाठबळ मिळत असतं. योजना राबवत असताना तिघांचंही मार्गदर्शन मिळायचं. पाच वर्षांच्या काळात गेल्या एक दीड वर्षांत काम करण्याची मुभा आणि संधी राज्यातील सर्वांत मोठी आणि महत्त्वांकाक्षी योजना मी या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून आणली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi tatkare on cabinet minister after chief minister conflict end sgk