Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या वादंग सुरू आहे. या योजनेबाबात श्रेयवाद सुरू झाला आहे. अजित पवार गटाने केलेल्या जाहिरातीवरून हा वाद सुरू झाला असून यामुळे महायुतीत आलबेल नसल्याचं बोललं जातंय. यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वादग्रस्त जाहिरात काय?

या योजनेच्या जाहिरातीत ‘अजित पवारांनी आणलेली माझी लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘दादाचा वादा’, ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’, ‘माझ्या अजितदादाने पैसे पाठवले’ असे संवाद या जाहिरातींमध्ये पाहायला व ऐकायला मिळत आहेत. “महिलांच्या बँक खात्यात येणारे १५०० रुपये ही भेट नाही तर माझ्या दादाचं प्रेम आहे. महिलांच्या स्वप्नांच्या उड्डाणातील छोटा पंख आहे आणि दादा तर एकच आहे. ही दादांची लाडकी बहीण योजना आहे”, अशी एक जाहिरात समाजमध्यमांवर व्हायरल केली जात आहे.

amchi dena bank lena bank nahi cm Eknath Shinde criticized opposition on Monday
आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
BJP worker Murder, Lonavla rural police,
हातऊसने दिलेल्या पैशांच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मित्रासह तिघे गजाआड
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Jayant Patil On Ajit Pawar
Jayant Patil : ‘सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल केलं’; त्यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा का होती? जयंत पाटलांचा मोठा दावा
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Sangli, Miraj, Women Representative Miraj,
सांगली, मिरजेच्या रणांगणात ‘लाडक्या बहिणी’ची चर्चा ! रिंगणातून बाजूला करण्याचे प्रयत्न

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

“जाहिरातीचा तो केवळ व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ पक्षाच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर करण्यात आलाय. ही जाहिरात कोणत्याही चॅनलवर प्रसारित झालेली नाही. न्यूज चॅनेल्सने सोशल मीडियावरील जाहिरात प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने योजनेचा प्रसार आणि प्रचार करत असतो. योजना यशस्वी होण्याकरता प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात देवाभाऊ यांचा या योजनेसाठी उल्लेख होत होता. एकनाथ शिंदे यांनीही राबवलेल्या जनसंवाद यात्रेत या योजनेसाठी त्यांचे आभार मानले जात होते. एकूणच, ही योजना माताभगिनींपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न सूर आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

हेही वाचा >> “माझ्या अजितदादाने पैसे पाठवले”, लाडकी बहीण योजनेच्या नावावरून शिंदे-पवारांमध्ये श्रेयवादाची लढाई? पाहा VIDEO

अजित पवार गटाने दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, या जाहिरातीवरून होत असलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, “आपल्याकडे केंद्र सरकारच्या अनेक योजना असतात. यापैकी बहुसंख्य योजनांना पंतप्रधानांचं नाव असतं. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या योजनांच्या नावात मुख्यमंत्री असा उल्लेख असतो. मात्र, लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याच्या व लोकांना समजण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही योजनेचं नाव लहान केलं आहे”.