आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. वैचारिक मतभेद आमच्यात आहेत. उद्धवजींनी वेगळा विचार सोबत घेतला आहे. माझ्या पक्षाचा विचार वेगळा आहे. आम्ही वैचारिक विरोधक आहोत. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीनुसार आपण वैचारिक विरोधक असतो. अलिकडच्या काळात आपल्याला थोडं शत्रुत्व पाहण्यास मिळतं आहे पण ते योग्य नाही ते कधीतरी आपल्याला संपवावं लागेल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मी अनेकदा मुलाखतीतही सांगितलं आहे, उद्धवजी काय किंवा आदित्य ठाकरे काय माझे शत्रू नाहीत. वैचारिक विरोधक झालो कारण त्यांनी दुसरा विचार स्वीकारला. माझा विचार वेगळा आहे. आम्ही वैचारिक विरोधक जरुर पण एकमेकांचे शत्रू नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत असा उल्लेख केला होता की उद्धव ठाकरेंनी आपल्याला धोका दिला. २०१९ मध्ये जेव्हा निवडणूक झाली त्यानंतर जो निकाल लागला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांनी हा दगा दिला होता, तर दुसरा दगा शरद पवारांन दिला कारण पहाटेच्या शपथविधीची त्यांना पूर्ण कल्पना होती असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शत्रू नाहीत असं वक्तव्य केलं आहे.

संजय राऊतांना टोला

संजय राऊत यांनी आरोप केला आहे की देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली. त्यावर विचारलं असता देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले की संजय राऊत यांना माझी क्षमता इतकी वाटते आहे, त्यांना इतका विश्वास वाटतो याबद्दल आभार मानू. पण तुम्हाला एक सांगतो अलिकडच्या काळात संजय राऊत जे बोलत आहेत ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. दुर्दैवाने कसं आहे एका पक्षाचे ते नेते आहेत. त्यांच्या लेव्हलच्या नेत्याने बोलताना थोडा विचार केला पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पहाटेच्या शपथविधीचं पूर्ण सत्य बाहेर येईल

पहाटेच्या शपथविधीचं अर्धसत्य तुम्हाला समजलं आहे.शरद पवारांना मी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर येऊ द्या लवकरच तुमच्यासमोर सगळं सत्य बाहेर येईल असंही सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.