पराभव दिसताच भाजपाकडून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण जातो, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच येत्या ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारसभेत बोलत होते.

हेही वाचा – विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपा आक्रमक, निवडणूक आयोगाकडे केली तक्रार; म्हणाले, “अशा आरोपांमुळे…”

BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“देशभरात भाजपाविरोधी वातावरण आहे. त्यामुळे मतदार आणि गावातील सरपंचांना धमकी दिली जात आहे. भाजपाला त्यांचा पराभव दिसू लागला आहे. पराभव दिसताच भाजपाकडून हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला जातो. जिथे-जिथे पराभव दिसायला लागतो, तिथे-तिथे भाजपाकडून वेगवेगळ्या पद्धतीने वाद निर्माण केले जातात”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

“आज गॅसचे दर १००० पार गेले. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना त्याचा त्रास होतो आहे. भाजपाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे तसेच प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासनही भाजपाने पूर्ण केलेले नाही. देशात आज हुकूमशाहीचं वातावरण आहे. भाजपाला देशाच्या संविधानात बदल करायचा आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “काँग्रेसच्या डीएनएमध्ये रामद्रोह”; राधिका खेरा यांच्या आरोपानंतर योगी आदित्यनाथांची काँग्रेसवर सडकून टीका!

यावेळी बोलताना त्यांनी ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल, असा विश्वासदेखील व्यक्त केला. “भाजपा ४०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं स्वप्न बघते आहे. मात्र, त्यांना २०० जागाही मिळणार नाही. त्यामुळे येत्या ४ जूर रोजी देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार हे निश्चित आहे”, असे ते म्हणाले.

Story img Loader