राज्यात डोळे बंद करून फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं? असा प्रश्न उपस्थित करत, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “सत्ता नसल्याने त्यांना वैफल्य आलं आहे.” असं म्हणत टोलाही लगावला आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज(रविवार) चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना विविध मुद्य्यांवर प्रश्न विचारले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाविकास आघाडीवर केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी म्हटले की, “देवेंद्र फडणवीस यांना सत्ता नसल्यामुळे वैफल्य आले आहे. त्यामुळेच ते कधी मुख्यमंत्र्यांवर बोलतात तर कधी सरकार कुठेच दिसत नाही, असं म्हणत असतात. त्यांना आपलं सरकार येईल आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन, असं सतत वाटत असतं. ही त्यांची उद्विग्नता आहे.”
“ सत्ता नसल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना वैफल्य आले आहे”; आदित्य ठाकरेंनी साधला निशाणा!
“डोळे बंद करुन फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं?” असा सवाल देखील केला आहे.
Written by रवींद्र जुनारकर
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-02-2022 at 21:40 IST
TOPICSआदित्य ठाकरेAaditya Thackerayभारतीय जनता पार्टीBJPमहाविकास आघाडीMahavikas AghadiशिवसेनाShiv Sena
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray criticized devendra fadnavis msr