मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थक एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. त्यांना गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त प्रेम दिले. आपल्या छातीवर नव्हे तर पाठीवर वार झाले आहेत. या ४० लोकांना आपण साथ दिली. आपण त्यांना राजकीय, सामाजिक ओळख दिली. ज्या लोकांना आपण खांद्यावर बसवलं त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ते कोल्हापुरात शिवसैनिकांना संबोधित करत होते.
हेही वाचा>>> “या पोराला काही शिकवलंय की नाही, गल्लीबोळात हिंडत होतं की काय?” ‘झाडी डोंगार’वाले शहाजीबापू पुन्हा आक्रमक
“या महाराष्ट्रात लोकांच्या प्रश्नाला कोणीही हात घालत नाही. आज राज्यात एक बेकायदेशीर सरकार बसले आहे. सरकार कोसळणारच हे तुम्ही लिहून घ्या. आज मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. जेव्हा मी घरी एकटा बसतो, गाडीमधून प्रवास करत असतो, तेव्हा आमचे कोठे चुकले हा एकच विचार करत असतो. आपण या गद्दारांना काय दिले नाही? मात्र त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुसपला. गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त प्रेम दिले. आपल्या छातीवर नव्हे तर पाठीवर वार झाले आहेत. या ४० लोकांना आपण साथ दिली. आपण त्यांना राजकीय, सामाजिक ओळख दिली. ज्या लोकांना आपण खांद्यावर बसवलं त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसला,” अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
हेही वाचा>>> “जे.पी. नड्डा असे म्हणालेले नाहीत” भाजपा अध्यक्षांच्या ‘त्या’ विधानानंतर फडणवीसांचे स्पष्टीकरण
“जेवण जास्त झालं होतं म्हणून हाजमोला खायला ते तिकडे गेले आहेत. त्यांना लाज नाही शरम नाही. हे लोक बंडखोर नाहीत तर गद्दार आहेत. भविष्यातही ते गद्दारच राहणार. यांना उठाव करायचा असता तर त्यांनी साहेब तुमचं हे चुकत आहे, असे सांगितले असते. ४० आमदार आणि १२ खासदार बेडकासारखे उड्या मारून गेले आहेत,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा>>> उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेताच फडणवीसांची ४ शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…
“सत्तेची भूक खूप असते. मात्र हीच भूक शेवटी मारते. मी तुमच्या साक्षीने सांगतो की माझ्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष नाही. मी काही चूक केलेली नाही. गद्दारी केलेली नाही. म्हणूनच तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत आहे. तुम्ही तिकडे गेलात तर सुखी राहा. मी तुमेच वाईट चिंतणार नाही. तसे संस्कार माझ्या घरातून आहेत,” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांबद्दल त्यांच्या मनात द्वेष नसल्याचे सांगितले.
हेही वाचा>>> “ममता बॅनर्जी, केसीआर माझ्या संपर्कात,” विरोधकांच्या एकजुटीवर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
“तुमच्यावर काही दडपण असू शकते. पण थोडी लाज उरली असेल. हिम्मत असेल तर आमदारकी आणि खासदारकीचा राजीनामा द्या. कोण सत्याच्या कोण असत्याच्या बाजूने आहे, हे एकदा होऊन जाऊद्या. हे गद्दाराचे सरकार आहे. बंडखोरातील काही आमदारांना फसवून तिकडे नेण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणे चूक होती, असे वाटत असेल तर त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत,” असे म्हणत त्यांनी शिंदे गटातील आमदार परत आले तर त्याचे स्वागत केले जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.