राज्यातील उद्योग तसेच अन्य विकासकामांच्या मुद्द्यावरून राज्यात महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजपा यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगलेली आहे. नव्या सरकारच्या काळात एकही नवा उद्योग आला नाही, असा दावा ठाकरे गट, तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीकडून केला जातो. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात नवे उद्योग आणण्याचे काम केलेले नाही, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. दरम्यान, ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील गुंतवणूक आणि नव्या उद्योगांच्या मुद्द्यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आज (१४ फेब्रुवारी) मागाठाणे येथील एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

हेही वाचा >>> ‘…तर ते अडचणीत येतील,’ म्हणणाऱ्या बावनकुळेंना आता अनिल देशमुखांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “माझं त्यांना आव्हान आहे की…”

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा

…तेव्हा साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक आली

“पुढच्या पिढीला रोजगार हवा असेल, नोकरी हवी असेल तर नव्या उद्योगांची गरज आहे. मात्र मागील सात ते आठ महिन्यांत महाराष्ट्रात एकही उद्योग आलेला नाही. महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा सुभाष देसाई उद्योगमंत्री होते, तेव्हा साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली. मात्र आताच्या उद्योगमंत्र्यांचे उद्योग त्यांनाही माहिती नाहीत. मात्र कोकणात जाऊन सभेत विचारलं तर कोकणातील लोक त्यांच्या उद्योगांबद्दल सांगतात,” अशी टीका अदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर केली.

हेही वाचा >>> फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर ‘पहाटेच्या शपथविधी’वर संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले “शरद पवारांनी…”

आपण बदलण्याची गरज नाही, आपण चोरी केली नाही

“आम्ही अशा लोकांना पदं देऊन चूक केली असे वाटते. आम्ही विश्वास ठेवला. विश्वास ठेवावा लागतो. आपण आगामी काळातही विश्वास ठेवत राहणार. आपण बदलण्याची गरज नाही. आपण चोरी केली नाही. ते म्हणत होते की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग आले नाही. मात्र महाविकास आघाडीने केलेल्या करारांपैकी ९३ टक्के करार अॅक्शनमध्ये आले आहेत. भूमिपूजनं झालेली आहेत. त्या कंपन्यांची कामं सुरू झालेली आहेत,” असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.