राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघे कुठे बसतात, काय काम करतात कोणालाच कळत नाही. पूरस्थिती असताना नेमकी कोणाला, काय मदत मिळत आहे, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. शिवसंवाद यात्रा गुरूवारी रात्री नाशिक येथे आल्यावर आयोजित शिवसेना मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात सत्तांतराच्या वेळी काय नाट्य घडले ते साऱ्यांनी पाहिले. ४० आमदार ज्यांच्यासाठी शिवसेनेने खूप काही केले. त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. नेमके यांना काय हवे होते, हे आजतागायत कळले नाही. आधी हिंदुत्व, नंतर निधी वाटप, राष्ट्रवादी अशी वेगवेगळी कारणे त्यांच्याकडून देण्यात आली. ही कारणे देणारेच आता मुख्यमंत्रीपदी विराजमान असताना आमच्यावरचा राग महाराष्ट्र, मुंबईवर का, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेता पण त्यांच्याच मुलाला, पक्ष प्रमुखांना तुम्ही मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले आहे, असे नमूद करीत ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शिवसेनेला साथ द्या, असे भावनिक आवाहन केले.

निधी वाटपात कुठलाही गैरव्यवहार केला नाही. सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आमचे घरून काम सुरू होते, तोवर सर्व सुरळीत सुरु होते. मात्र, प्रत्यक्षात काम करायला सुरूवात केली. तेव्हा या लोकांना अडचणी आल्या. वादाला सुरूवात झाली. करोना काळातही काम सुरू होते. मुख्यमंत्री आजारी असतानाही सर्वांच्या संपर्कात होते. कुठलेही काम अडवले नाही. आज चित्र उलट आहे. राज्यात गट तट पडायला लागले आहेत, कोण काय काम करत आहे हेच कळत नाही. दोन लोकांवर राज्य सुरू आहे. अद्याप मंत्री मंडळाचा विस्तार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.