वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने २०२३ मधल्या जागतिक युवा नेत्यांच्या यादीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते यांच्यासह ७ भारतीय तरुणांचा समावेश केला आहे. या यादीत समाविष्ट केलेल्या भारतीयांमध्ये टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, जिओ हॅप्टिक टेक्नोलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकृत वैश, बायोझिनचे सीईओ बी. जोसेफ, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई आणि पॉलिसी ४.० रिसर्च फाऊंडेशनच्या सीईओ तन्वी रत्ना यांचा समावेश करण्यात आला आहे.

जागतिक आर्थिक परिषदेने यावर्षी ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या युवा नेत्यांची यादी जाहीर करताना म्हटलं आहे की, हे तरुण संवाद करण्यास सक्षम आहेत. सक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते आर्थिक समावेशापर्यंत तसेच इतर अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये सहभागी आहेत. यातले अनेक सदस्य नोबेल पारितोषिक विजेते, राष्ट्र प्रमुख, फॉर्च्यून ५०० कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते बनले आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे ही वाचा >> दोन बायका, कोर्टाचा अजब निर्णय ऐका…! मध्य प्रदेशमधल्या न्यायालयाने सोडवलं दोन बायकांचं भांडण

१२० देशांमध्ये तरुणांचा समावेश

World Economic Forum ने म्हटलं आहे की, या वर्षाच्या यादीत १०० युवा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे जे राजकीय, नाविन्यपूर्ण उपक्रम, परिवर्तनात्मक संशोधनासारख्या गोष्टींमध्ये सहभागी असलेले, भविष्यवादी विचारसरणी असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये १२० देशांमधल्या तरुणांचा समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader