कराड : शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची मल्हारपेठ येथे निष्ठा यात्रा आणि त्या अनुषंगाने झालेल्या सभेबाबत आपण ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत ठाकरेंची निष्ठा यात्रा असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नसल्याची टीका पाटणचे आमदार व राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना केली.

शंभूराज देसाई हे मुंबईमधून बोलत होते. आपण मतदार संघातील महत्वाच्या कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रा आणि सभेची माहिती आपले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून घेतली. त्यावरून एका वाक्यात बोलायचं झालं तर ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत ठाकरेंची निष्ठा यात्रा होती.

पाटण तालुक्यातील आपले पारंपारिक विरोधक पाटणकर समर्थक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणारे लोकच गाड्याच्या गाड्या भरून आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेत सहभागी झाल्याचे सगळ्यांनी पाहिले. मला एका गोष्टीचे समाधान आहे की आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या निमित्ताने का होईना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाटणकर गटाच्या गळ्यात आम्हाला भगवा गमछा बगायला मिळाला. जो की क्षणिक आणि आजच्या दिवसापुरता कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आणलेला होता. हा भगवा गमछा, गर्दी आदित्य ठाकरे यांना दाखवण्यासाठी माझ्या तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठबळ दिले असल्याचा आरोप शंभूराजे यांनी केला.

या सभेमध्ये काही वक्ते माझ्याबाबतीत बोलले. दगडूदादा सकपाळ म्हणाले की, मी परत निवडून येऊन दाखवावं खरतरं त्यांची हौस निवडणुकीतील पराभवाने पूर्ण झाल्याचे दिसत नाही. स्वत:च्या मतदार संघात सकपाळ यांना २०-२२ हजारच मते पडतात. त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातून कुणी निवडून यावं आणि मी कसा निवडून टोला शंभूराज यांनी या वेळी लगावला.

Story img Loader