धाराशिव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार उपस्थित होते. यावेळी आयोजित रॅलीला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटावर टीका केली. तसेच धाराशिवचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, “खेकड्यांवरही बोलणार, सोडणार नाही. जो जो वाकडा जाईल, त्याच्यावरही बोलणार, खेकड्यांची नांगी आपल्यालापण ठेचता येते”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“शेतकरी म्हणून आज तुम्ही खुश आहात का? या दोन वर्षात तुमच्या शेतीमालाला भाव मिळाला का? जेव्हा अवकाळी पाऊस, गारपीट झाली तेव्हा नुकसान भरपाई मिळाली का? या सरकारकडून मदत मिळाली का? केंद्र सरकारकडून मदत मिळाली का? नाही मिळाली. मग जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कर्जमाफी मिळाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मागे उभे राहा”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास! “आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू भाजपाची ४५ + ची संख्या…”

ओमराजे जिगर का तुकडा

“आज अनेक उमेदवारांचे अर्ज भरायचे सुरु आहेत. पण ओमदादा जिगर का तुकडा आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी आलो. आपल्याला पुन्हा एकदा हक्काचे सरकार आणायचे असेल केंद्र सरकारमध्ये पुन्हा आपल्या हक्काचा माणूस म्हणून ओमराजे निंबाळकर यांना दिल्लीला पाठवायचे आहे. गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी ही लढाई आहे”, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला.

“शेतकऱ्यांना आपण अन्नदाता समजतो. मग केंद्र सरकारने दिल्लीत शेतकऱ्यांच्या रस्त्यावर खिळे ठोकून ठेवले. लाठी चार्ज केला, मग हे सरकार तुमचे आमचे असू शकते का? आज या देशात शेतकरी हैराण आहे. गॅसच्या किंमती वाढल्या आहेत”, अशा अनेक मुद्यांवरुन आदित्य ठाकरे यांनी भाजपा सरकारवर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray on tanaji sawant in dharashiv lok sabha constituency politics and shivsena candidate omprakash rajenimbalkar gkt