महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी सायंकाळी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. राज सुमारे ४० मिनिटं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर होते. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंनी १ सप्टेंबर रोजी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. आज राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. असं असतानाच शिंदे गट आणि मनसेच्या युतीच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळातही सुरु आहेत. याचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उल्लेख शिवसेनेला संपवायला निघालेले छुपे हात असा केला आहे.
नक्की पाहा >> Photos : मध्यरात्री ‘मातोश्री’वरुन फडणवीसांचा फोन, अडीच मिनिटांची बंद खोलीतील भेट अन्…; अमित शाहांनी सांगितला युती तुटल्याचा घटनाक्रम
शिंदे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे शिवसेनेला संपवायला निघाले आहेत ते…”
राज ठाकरे सुमारे ४० मिनिटं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर होते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-09-2022 at 13:18 IST
TOPICSआदित्य ठाकरेAaditya Thackerayएकनाथ शिंदेEknath ShindeमनसेMNSराज ठाकरेRaj ThackerayशिवसेनाShiv Sena
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray react on eknath shinde group and raj thackeray mns alliance scsg