मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार तर ठाकरे गटाला मशाल हे नवं निवडणूक चिन्ह अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलं आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचं मूळ निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आयोगाने मंजूर केलं आहे. आयोगाच्या या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी आमच्याकडे बहुमत असून ‘धनुष्यबाण’ चिन्ह आम्हाला मिळायला हवं होतं असं विधान केलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांना एका मुलाखतीमध्ये ‘धनुष्यबाण’ आणि ‘शिवसेना’ हे नाव दोन्ही शिंदे गटाला मिळालं तर काय असा प्रश्न विचारण्यात आला.

नक्की वाचा >> “…त्या दिवशी मला फार दु:ख झालं”; उद्धव ठाकरेंसंदर्भातील ‘तो’ प्रसंग सांगत सुधीर मुनगंटीवार यांचं विधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिंदे काय म्हणाले?
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांची नावं निश्चित केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदेंनी, “हा निर्णय आमच्यासाठी अन्यायकारक आहे. धनुष्यबाण चिन्हं बहुतमच्या आधारे आम्हाला मिळायला हवं होतं. आमच्याकडे ७० टक्के बहुतम आहे. आमचा चिन्ह आणि पक्षासंदर्भातील दावा कायम आहे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली होती.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंनी तत्काळ अंमलबजावणी करत बदलले पक्षाचे नाव”; मनसेनं शेअर केलेला स्क्रीनशॉट चर्चेत

आदित्य काय म्हणाले?
याचसंदर्भात आदित्य यांना ‘मुंबई तक’वरील विशेष मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. “उद्या धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदेंकडे गेलं तरी तुमची लढण्याची तयारी आहे का? कारण निवडणूक आयोगाचा संपूर्ण निर्णय अद्याप लागलेला नाही. सध्या देण्यात आलेला निर्णय हा अंतरिम निर्णय आहे,” असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “काय होतं हे बघणं गरजेचं आहे. कारण हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे परिवार यांच्याबद्दल राहिलेला नाही. हा प्रश्न न्यायव्यवस्थेसंदर्भात आहे. न्याय होणार आणि आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे. संविधान आणि लोकशाहीबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मला वाटतं की फक्त देशाचं नाही संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे,” असं अदित्य म्हणाले.

नक्की वाचा >> “…त्यामुळे निवडणूक आयोगाला धनुष्यबाण आम्हालाच द्यावा लागेल”; ठाकरेंना ‘मशाल’ मिळाल्यानंतर CM शिंदेंचं विधान

अमिताभ यांचा उल्लेख
“३ नोव्हेंबरच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबरोबरच आगामी निवडणुकांमध्ये बाळासाहेबांचे विचार आणि संपूर्ण कॅडर कोणाकडे आहे हे कळेल,” असं पत्रकाराने म्हटलं. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य यांनी, “तुम्ही जे सांगितलं ते ऐकून आज मला बच्चनसाहेबांचा वाढदिवस असल्यानिमित्त एकच शब्द आठवतोय तो म्हणजे ‘अग्निपथ’ हेच शब्द मी आज सगळीकडे घेऊन फिरत आहे,” असं मुलाखतीच्या शेवटी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray react on question of what if shivsena name bow arrow symbol goes to cm eknath shinde group scsg