Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. राज्य सरकारच्या विरोधी बाकावर बसलेला नेता आता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याने महाराष्ट्रातील जनताही गोंधळली आहे. यावरून उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या असून विरोधकांकडून टीकाही केली जातेय. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी मी या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे, असं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करून राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे.

“मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत विचारला आहे.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Loksatta editorial on allegations on dhananjay munde in beed sarpanch santosh Deshmukh murder case
अग्रलेख: वाल्मीकींचे वाल्या!

हेही वाचा >> “जरा थांबा हो, शरद पवारांनी अजून फोनाफोनी सुरू केलेली नाही”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान; नेमकं काय घडणार?

“रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?”, असाही मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे.

“एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला?? आणि सर्वात महत्वाचं… आम्ही काँग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना… एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! ‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’, अशी ही लढाई असणार आहे!”, असंही टीकास्त्र आदित्य ठाकरेंनी सोडलं.

राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाड

दरम्यान, राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाचा अजित पवारांनी शुक्रवारीच राजीनामा दिला होता. त्यामुळे अजित पवारानी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राष्ट्रावादीने राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. तसंच, अनिल पाटील यांच्याकडे असलेले प्रतोदपदही जितेंद्र आव्हाडांना देण्यात आले आहे. त्यामुळे मी जो व्हिप जारी करेन तोच सर्वांना लागू होईल, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली.

Story img Loader