संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका झाल्या असून बोलणीही सुरु आहे, असा दावा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आहे. दरम्यान, नितेश राणेंच्या या दाव्यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित का होता? प्रश्न विचारताच अजित पवार चिडले, म्हणाले, “ए…”

Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती

आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांना नितेश राणेंच्या दाव्याबाबत विचारण्यात आलं असता, आज हास्यदिन आहे. त्यामुळे अशा विषयावर न बोललेलंच बरं, असं म्हणत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार”, नितेश राणेंच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले, “या पोरासोरांच्या…”

पुढे बोलताना त्यांनी कर्नाटक दौऱ्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनाही लक्ष्य केलं. “५० खोके वाले आज ४० टक्क्यांसाठी कर्नाटकमध्ये भाजपाच्या प्रचाराला गेले आहेत. खरं तर तिथे जाऊन त्यांनी सीमा भागातील मराठी बांधवांशी संवाद साधायला हवा होता, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठिशी त्यांनी उभं राहायला हवं होतं. मात्र, मिंधे ते मिधेंच. केवळ स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी ते आपल्या बॉसचं ऐकून भाजपाच्या प्रचारासाठी गेले”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंना पक्षात मोठी जबाबदारी देणार? शरद पवार म्हणाले, “एका वर्षात…”

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मतभेद असून यापुढे त्यांची वज्रमूठ सभा होणार नाही, अशी टीका भाजपा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं. “विरोधकांना वज्रमूठ सभेचा धक्का बसला आहे. त्यामुळे ही सभा होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, खारघर सारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून वज्रमूठ सभा उन्हाळ्यानंतर घेण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची” असे ते म्हणाले.

Story img Loader