महाराष्ट्रात जी परिस्थिती झाली आहे तेव्हा वाटलं की खोके सरकार आहे. धोके सरकार आहे, पण चिंधीचोर सरकारही भाजपाने डोक्यावर बसवलं आहे अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी कल्याणमध्ये केली. गद्दार आणि चोरांच्या सरकारमध्ये गुंडाराज आहे. काल-परवाकडे गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. ती घटना तुम्ही पाहिली असेलच भाजपाच्या आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केला. नंतर टीव्हीवर येऊन गायकवाड यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांवर जे आरोप केले ते पण सगळ्यांना माहीत आहे. चिंधीचोर आणि गुंडांचं राज्य उलथवून लावा हे आवाहन करायला मी कल्याणमध्ये आलो आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

एकनाथ शिंदेंचं नावच मिंधे आणि गद्दार झालंय. पण जे काही घडतंय त्यात बदनामी महाराष्ट्राची होते आहे. दोन पक्ष चोरलेले आणि एक भाजपा हे काय करत आहेत? गुंडांची भेट घेत आहेत. गुंड मंत्रालयात जात आहेत. गुंड रिल्स तयार करत आहेत. आपण जनता म्हणून शांत किती दिवस बसायचं? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग पाहिले आहेत. आपले होर्डिंग काढावे लागतात. मग गद्दारांचे होर्डिंग कसे चालतात? असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी विचारला. महाराष्ट्रात जे वातावरण आहे, मी पाहिलं सगळीकडे मिंध्यांचे बॅनर आहेत. हे सगळं किती योग्य आहे? चिंधीचोरांना, गुंडांना हे बॅनर लावायला सांगतात. हे पैसे येतात कुठून हे ईडी विचारणार आहे का? कायदा आहे तरी कुठे? हा प्रश्न आम्हाला पडला आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी लढतोय. मी मागची दोन वर्षे पाहतोय महाराष्ट्रात उद्योजकांना हैराण केलं जातं आहे. इथे येणारे प्रकल्प गुजरातला पाठवले जात आहेत.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश
three KZF terrorist involved in Gurdaspur grenade attack killed
Punjab Grenade Attacks : पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ला करणारे तीन दहशतवादी एन्काउंटरमध्ये ठार; यूपी आणि पंजाब पोलि‍सांची संयुक्त कारवाई

आपण गप्प बसायचं का?

या सरकारविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला की चिंधीचोर आणि गुंड त्यांच्या घरी पाठवले जात आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालाय. पाच वाजता आम्ही बोललो. त्यानंतर ही घटना घडली. हे होत असताना आपण गप्प बसायचं का? कोल्हापूरचा एक व्हिडीओ आलाय हात जोडून विनंती करते आहे मला मारु नका, मात्र घरात जाऊन मुलीला, महिलेला मारलं जातं. कारवाई होत नाही. मुंबईतल्या माहीममध्ये एका गद्दार आमदाराने गणपतीच्या मिरवणुकीत बंदूक काढली होती. गद्दार आम्हाला शिव्या देतात ते बरं वाटतं. त्या आमदाराने पोलीस ठाण्यात फायरिंग केलं. त्याचा अहवाल तयार आहे पण सादर झालेला नाही. हे सरकार हिंदुत्व शिकवतं आहे. पोलीस ठाण्यात फायरिंग केला तर UAPA कायदान्वये कारवाई का झाली नाही? या निर्लज्ज सरकारने सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्ष त्या आमदारांन केलंय. यांचं हिंदुत्व रावणाचं आहे आणि आपलं रामाचं हिंदुत्व आहे. कोण बंदूक काढतंय, गोळीबार करतंय कुणाला अटक होत नाही. मात्र मंत्रालयातली टोळी आपल्या राज्याला बदनाम करते आहे. असाही आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहीसर येथे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. उल्हासनगर येथील गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण शांत होत नाही तोवर ही घटना घडल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना माहिती दिली. अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत.

Story img Loader