जळगाव – सध्या महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू आहे. मध्यरात्री आपले फलक फाडले; परंतु मी सांगतो अशा या चिंधीचोरांकडे लक्ष देऊ नका. यांच्याकडे फाडायला फलक आहे. मात्र, मी या गद्दारांचा मुखवटा फाडायला आलो आहे, असा घणाघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी धरणगाव येथे केला.

जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावमध्ये आदित्य यांची शनिवारी सायंकाळी जाहीर सभा झाली. त्यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. स्वत:ला ते शिवसैनिक म्हणून घेत होते. मात्र, यावेळी या सर्व गद्दारांनी मस्ती करीत महाराष्ट्राची लाज घालविली. जिथे आहे तिथे आनंदाने राहा. मात्र, थोडीशी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हानही आदित्य ठाकरेंनी दिले.

Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
उद्धव ठाकरे आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार? महाराष्ट्रात अशा चर्चा का सुरू झाल्या? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार? सामनातील अग्रलेखामुळे चर्चा कशासाठी?
Rajan Salvi
Rajan Salvi : “योग्यवेळी योग्य निर्णय घेणार”, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांचं मोठं विधान; पक्ष बदलाचे दिले संकेत

 शिवसेनेला संपविण्याचाच नव्हे, तर ठाकरे कुटुंबियांना संपविण्याचे घाणेरडे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाला एकटे पडू देऊ नका. सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन आदित्य यांनी केले. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, ते तात्पुरते आहेत, तर हे सरकार म्हणजे गद्दारांचे सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे सरकार कोसळणारच, असे वाक्बाणही आदित्य ठाकरेंनी सोडले.

पारोळा येथील सभेतही गद्दार आमदार स्वार्थासाठी बाहेर पडले, तरी त्यांना दुसरीकडे जाऊनही काहीच मिळाले नसल्याची टीका त्यांनी केली. बाजूचे आमदार मंत्री बनले असताना पारोळय़ाचे आमदार मंत्री बनले काय, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला. शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने शेवटच्या टप्प्यातील दौर्यातील जाहीर सभांत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा गद्दारांना लक्ष्य केले.

..तर ही वेळ आली नसती ;  गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर

 शिवसेनेतून फुटणारा मी पहिला आमदार नव्हतो. २० आमदारांना घेऊन मी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही अनेकदा तह केले असल्याने, आपण पक्ष वाचविण्यासाठी तह करावा, असे सुचविले; परंतु त्यांनी ऐकले नाही. तेव्हाच तह केला असता तर ही वेळ आली नसती, असे प्रत्युत्तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दिले. आदित्य यांनी शनिवारी पाचोरा, धरणगाव, पारोळा मतदारसंघांत सभा घेत बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी आदित्य हे मंत्री बनल्याबरोबर राज्यभरात फिरावे, अशी सर्वाची इच्छा होती; परंतु ते त्यावेळी फिरले नाहीत. आता सत्तांतर झाल्यानंतर ते राज्यभरात फिरत आहेत, असा टोला हाणला. शिवसेना वाचावी हा आमचा प्रयत्न होता. आम्ही आजही शिवसैनिकच आहोत. आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत.

आदित्य यांनी त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी दौरा केला असावा. आम्ही शिवसेना वाचविण्यासाठी प्रयत्न केला, असेही गुलाबरावांनी सांगितले. ज्या एकनाथ खडसे यांनी युती तोडली, त्यांच्यासोबतच तुम्हीच बसले आहेत, हे पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

जळगाव जिल्हा दौऱ्याप्रसंगी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना तलवार भेट देताना महापौर जयश्री महाजन .

Story img Loader