कराड : आदित्य ठाकरे यांच्या अज्ञानपणाच्या, (अनमॅच्युरिटी) वक्तव्यांमुळेच शिवसेनेत फूट पडली. आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांना सौम्य भाषेत उत्तरे दिली जातील. त्यातून महाराष्ट्राच्या जनतेला खरी गद्दारी, लाचारी कोणी केली. हे आपण पक्षाचा प्रवक्ता म्हणून लवकरच सांगणार असल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> “नातू आहे म्हणजे अक्कल आली असं होत नाही,” संजय शिरसाट आदित्य ठाकरेंवर संतापले; म्हणाले, “त्यांना गल्लीत…”

कराडमध्ये शिक्षण मंडळ संस्था व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सावाच्या समारोपाला  मंत्री केसरकर आले असता माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या  विचारांचा स्वाभिमान एकनाथ शिंदे यांनी जपला. बाळासाहेबांच्या विचारावरच आम्हा सर्वांची वाटचाल सुरू आहे. अन्यथा, विकत जाणारी लोकही आम्ही पाहिलीत. तेंव्हा आदित्य ठाकरेंनी वयाप्रमाणेच बोलावे. आदित्य ठाकरे हे वयाने लहान आहेत. मंत्रिपदाच्या अडीच वर्षात आपल्या स्वतःच्या कार्यालयात एक महिना सुद्धा ते गेले नाहीत. लोकांची सेवा, राजकारण आणि समाजकारण म्हणजे काय हे ते कधी समजू शकलेले नाहीत. स्वातंत्र्यवीर  सावरकरांबद्दल चुकीचे शब्द काढणाऱ्यांना आणि कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना मिठी मारण्यासारखा प्रकार म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराचा मोठा अपमानच असल्याची टीका दीपक केसरकर यांनी या वेळी बोलताना केली.

Story img Loader