युवासेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी तीन महिन्यांपूर्वी राज्यामध्ये झालेल्या बंडखोरीच्या राजकीय नाट्यमय घडामोडींबद्दल भाष्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरेंनी माजी सहकारी आणि विद्यमान मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेंसंदर्भात उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाची चूक केल्याचं मत आदित्य यांनी व्यक्त केलं आहे. बंडखोरीची कल्पना एक ते दीड वर्षांपूर्वीच आली होती असंही आदित्य यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ठाकरेंची मतदानाला दांडी! पवार-शेलार गटातून निवडून आल्यानंतर मिलिंद नार्वेकर स्पष्टच बोलले, “ते नाही आले तरी हरकत नाही, उमेदवारी…”

सर्व सत्ता आणि मुख्यमंत्रीपद हाती असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने आमदार फुटून बाहेर पडले. याची पूर्वकल्पना आली नाही किंवा अंदाज बांधण्यात उद्धव ठाकरे आणि तुम्ही कमी पडलात का अशा स्वरुपाचा प्रश्न आदित्य यांना ‘मटा कॅफे’च्या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आदित्य यांनी सविस्तर घटनाक्रम सांगताना दीड वर्षांपासूनच ठाकरे कुटुंबाला शिंदे असं काहीतरी करण्याच्या विचारात असल्याची चाहूल लागली होती असं नमूद केलं. शिंदेंच्या जवळचे लोक असतील किंवा इतर माध्यमांमधून ठाकरे कुटुंबाच्या कानावर ही कुणकुण आली होती असंही आदित्य यांनी म्हटलं. या दीड वर्षांच्या कालावधीमध्ये अनेकांनी यासंदर्भात आम्हाला इशारा देत सांगितल्याचंही आदित्य म्हणाले.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

नक्की वाचा >> “माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; CM शिंदेंच्या बाजूला बसून पवारांचं विधान; फडणवीस भन्नाट उत्तर देत म्हणाले, “सासरच्या माणसांना…”

आम्ही एकनाथ शिंदेंवर डोळे बंद करुन विश्वास ठेवला हीच आमची चूक झाली असं आदित्य यांनी म्हटलं आहे. “त्यांच्या (शिंदेंच्या) काही जवळचे लोक, पीए वगैरे जेलमध्ये होते की काय हे जगजाहीर आहे. पण विश्वास आपल्या माणसांवर ठेवायचा की जे येऊन सांगतात त्यांच्यावर? हा माणूस फूटू शकतो, आमच्याबरोबर येऊ शकतो असं सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? कदाचित यात आमची चूक झाली,” असं आदित्य यांनी म्हटलं आहे. म्हणजेच शिंदे फुटू शकतात हे सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी ठाकरे कुटुंबाने शिंदेंवरच विश्वास ठेवाला असं आदित्य यांना सूचित करायचं होतं. “आम्ही या व्यक्तीवर (शिंदेंवर) विश्वास जास्त ठेवला. डोळे बंद करुन विश्वास ठेवला. सहाजिक आहे की गेल्या १५-२० वर्षात तुम्ही ज्या व्यक्तीला सगळं काही दिलं त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा? ही चूक आमची झाली असेल,” असं आदित्य यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची…”; पवार अन् फडणवीसांच्या मध्ये उभं राहून भाषण देताना CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

पुढे बोलताना आदित्य यांनी युनायटेड किंग्डममधील उदाहरण दिलं. “या राजकारणात टीकायला घाणेरडं राजकारणच तुमच्या रक्तात लागतं का? की आपण हे स्वच्छ करणार आहोत राजकारण याचा विचार केला पाहिजे. जगात आपण पॅटर्न बघतो जेव्हा लक्षात येतं की युनायटेड किंग्डममध्येही चार वर्षात तीन पंतप्रधान झाले आहेत. पण अशी गद्दारी कुठेच झाली नाही की स्वत:लाच विकून टाकतो,” असा टोला आदित्य यांनी शिंदेंना लगावला.

नक्की वाचा >> “शरद पवार २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदींना साथ देतील असा विश्वास वाटतो”; मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं विधान

तसेच २० मे २०२२ रोजी म्हणजेच या फुटाफुटीच्या राजकारणाच्या महिनाभर आधी उद्धव ठाकरेंनी शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं असंही आदित्य यांनी सांगितलं. “२० मे ला त्यांना ‘वर्षा’वर बोलवलेलं उद्धवसाहेबांनी आणि विचारलेलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? ही घ्या चावी आणि मुख्यमंत्री व्हा. मला काही मुख्यमंत्री होण्यात आनंद नाही. मला जबाबदारी दिली आहे ती स्वीकारली आहे. लोकांची सेवा करतोय, तुम्हाला व्हायचं असेल तर व्हा मुख्यमंत्री असं उद्धव ठाकरेंनी शिंदेंना सांगितलं होतं. तेव्हा ते रडले वगैरे. इतर जो काही असतो तो थोडा ड्रामा झाला. तुम्हीच मुख्यमंत्री, तुम्हीच आमच्यासाठी देव वगैरे वगैरे झालं,” असं आदित्य यांनी सांगितलं. तसेच, “दुसरे मंत्री ज्यांना आता डाऊनग्रेड केलं आहे. त्यांनी तर पोह्यांवर म्हणजे अन्नाची शपथ घेतली होती. काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही, तुमची साथ सोडणार नाही. गद्दारी करणार नाही. तेही निघून गेले,” असंही आदित्य म्हणाले.

Story img Loader