शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. कधीकाळी सहकारी असलेले नेते बंडखोरीनंतर आता राजकीय विरोधक झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांना टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून राजकीय डावपेच आखले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याकडे लक्ष दिलं असून ते शिंदे गटातील नेते तथा मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार तसेच आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात शेतकरी मेळावे घेणार आहेत.

हेही वाचा >>> Thackeray vs Shinde: “…म्हणून मला हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणता येणार नाही”; ठाकरे, शिंदेंचा उल्लेख करत उज्ज्वल निकमांचं विधान

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
maharashtra assembly election 2024 there is no election campaign tour of aditya thackeray in thane district
ठाणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा प्रचार दौराच नाही
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
uddhav thackeray shiv sena leader ex mla rupesh mhatre join eknath shinde shiv sena
ठाकरे गटाचा माजी आमदार शिंदे गटात; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

मागील काही दिवसांपूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना दोघेही राजीनामा देऊ, कोण सरस ठरतं ते पाहुया, असे खुले आव्हान दिले होते. तसेच संदिपान भुमरे आणि संजय शिरसाट हेदेखील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. असे असताना आता आदित्य ठाकरे येत्या ७ नोव्हेंबर रोजी अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड या मतदारसंघात शिवसंवाद शेतकरी मेळावा घेणार आहेत. तसेच ८ नोव्हेंबर रोजी ते संदिपान भुमुरे यांच्या पैठण या मतदारसंघात शिवसंवाद शेतकरी मेळावा घेणार आहेत. संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातही अशाच प्रकारचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आहे. याबाबतचे वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिले आहे.

हेही वाचा >>> जळगावात सभा सुषमा अंधारेंची, मंचावरून राष्ट्रवादीच्या नेत्याची गुलाबराव पाटलांविरुद्ध तुफान फटकेबाजी

अब्दुल सत्तार यांचे आदित्य ठाकरेंना खुले आव्हान

काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना खुले आव्हान दिले होते. “मुख्यमंत्री ज्या ठिकाणी जातात तेथील जनसमुदाय पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतो. आम्ही जवळगावला गेलो, शिल्लोड, मालेगावला गेलो. मात्र अत्यंत कमी वेळात एकनाथ शिंदे यांना भरपूर प्रेम मिळाले. याच कारणामुळे काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठत आहे. नंबर दोनचे पप्पू मला दोन वर्षांनंतर कोण काय आहे आणि कोण बाप आहे, याची माहिती होईल, असे म्हणाले. पण दोन दिवसांत तुम्ही राजीनामा द्या मिही राजीनामा देतो. दोघांचा सामना होऊद्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. अब्दुल सत्तार काय आहे हे सिल्लोडमध्ये समजेल. तर तुम्ही काय आहात हे वरळीमध्ये मुंबईत समजेल,” असे सत्तार आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्हणाले होते.