विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालाचे स्वागत करत असताना उबाठा गटावर घराणेशाही, एकाधिकारशाही याबद्दलची टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले आहे. श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? असा प्रश्न संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित करत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता शिंदे गटाचे ठाण्यातील नेते नरेश म्हस्के यांनीही एक खळबळजनक आरोप केला आहे. ठाकरे गटाचे नेते निकालावरून भाजपावर टीका करत असले तरी ते छुप्या मार्गाने भाजपाच्या सर्वोच्च नेत्याला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा मस्के यांनी केला.
विश्लेषण : विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाने गोंधळात भर? ठाकरे गटाच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात?
ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, “शिल्लक सेनेचे नेते सरबरीत झाले आहेत. त्यांच्याकडून काहीही आरोप होत आहेत. कालच्या निर्णयानंतर असा आरोप केला जात आहे की, भाजपाने शिवसेना संपविण्याची सुपारी घेतली. त्यांच्या स्क्रिप्टप्रमाणे दिल्लीवरून हा निकाल आला, असा बिनबुडाचा आरोप केला जात आहे. परंतु मी खात्रीपूर्वक सांगतो. आदित्य ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपामधील सर्वोच्च नेत्याला भेटण्याची वेळ मागितली आहे. त्या नेत्यांनी अजून वेळ दिलेली नाही. त्यावरून हे दुतोंडी आहेत, हे स्पष्ट होते.”
“एकीकडे भाजपावर टीका करायची आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भाजपा नेत्याकडे वेळ मागायची, हे दुतोंडी सापाप्रमाणे वर्तन सुरू आहे. महाविकास आघाडीला एकीकडे झुलवत ठेवायचे आणि दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांशी संधान बांधण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून केला जात आहे”, असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला.
एबी फॉर्म घेताना घराणेशाही नव्हती का? एकनाथ शिंदे यांच्या जुन्या ट्विटचा दाखला देऊन ठाकरे गटाची टीका
श्रीकांत शिंदे स्वकर्तृत्वावर खासदार
घराणेशाहीच्या टीकेवरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली. त्यावर उत्तर देताना नरेश म्हस्के म्हणाले, “खासदार श्रीकांत शिंदे हे स्वकतृत्वावर आणि मेहनत घेऊन आपल्या लोकसभा मतदारसंघात काम करत आहेत. त्यांनी अनेक कामे मतदारसंघात केली आहेत. खासदार कसा असावा? याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे. त्यांना हल्लीच संसदरत्न पुरस्कारदेखील मिळाला आहे. संजय राऊत यांच्याकडे कुठलेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाही, त्यामुळे ते या स्तरावर उतरले आहेत.”
श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? शिंदेच्या घराणेशाहीवरील टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
काय म्हणाले संजय राऊत?
घराणेशाहीचा अंत झाला, असे एकनाथ शिंदे म्हणत आहेत. मग श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही का? त्याला पद देताना माझा मुलगा आहे, त्याला पद द्या, असे सांगून पद घेतले होते. घराणेशाहीवर बोलण्याआधी तुम्ही श्रीकांत शिंदेवर बोला, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले. “बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्याकडे घराणेशाही कधीच नव्हती. विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी त्या त्या कुटुंबातील लोक पुढे येतात. लोकांना ते स्वीकारायचे असेल तर ते स्वीकारतात नाहीतर त्यांना बाजूला करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात घराणेशाही नाही. त्यांच्या घरातील लोक जर बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेले तरच लोक त्यांना स्वीकारतील”, असेही संजय राऊत म्हणाले.