माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते, असा खळबळजनक दावा भाजपा नेते तथा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठका घेतल्या होत्या, असं ते म्हणाले. रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – रिफायनरीसंदर्भात उदय सामंतांची विनायक राऊतांबरोबर बैठक; घेतले ‘हे’ सहा महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर

dcm ajit pawar warning pimpri chinchwad police over liquor sale prostitution in alandi
आळंदीतील मद्यविक्री, वेश्याव्यवसाय बंद न झाल्यास पोलिसांवर कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ajit Pawar private secretary, Supriya Sule,
बारामतीत शासकीय कार्यक्रमात अजित पवारांंचा खासगी सचिव व्यासपीठावर?; राजशिष्टाचारात बदल केले का? सुप्रिया सुळेंचा सवाल
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
Ladki Bahin Yojana, Devendra Fadnavis, BJP, Congress, Anil Wadpalliwar, High Court, women s schemes, election strategy, Eknath Shinde, Nana Patole, Maharashtra politics,
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीच्या निशाण्यावर आलेले वडपल्लीवार आहेत तरी कोण ?
ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

“उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र रचत होते. माझे वडील आजारी आहेत, आता ते बरे होणार नाहीत असं ते सांगायचे. त्यासाठी जसलोक रुग्णालयातील एका खोलीत बैठका झाल्या. रुग्णालाच्या कोणत्या खोलीत या बैठका झाल्या हे मला माहिती आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज मी देऊ शकतो”, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केल्यानंतर हे प्रकरण थांबलं, असंही ते म्हणाले.

हेही वाचा – यवतमाळ : बाजार समितींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना दे धक्का; पालकमंत्री संजय राठोड व माजी मंत्री माणिकराव ठाकरे गृह मतदारसंघात ‘फेल’

दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंवर टीका

यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दावोस दौऱ्यावरून टीका केली. “वडील आजारी असताना आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई आणि त्यांच्या टोळीला घेऊन दावोस गेले होते. तिथे ते मजा मारत होते”, असं ते म्हणाले.

हेही वाचा – VIDEO : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी बारसू रिफानरी प्रकरणावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. ७० टक्के लोक रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने आहेत, असं सांगायला तुम्ही काय सर्व्हे केला होता काय? असा प्रश्न राऊतांनी राज्य सरकारला विचारला होता. यासंदर्भात बोलताना, “सरकारने सर्व्हे केला नव्हता, तर प्रकल्पाच्या विरोधात लोक आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही तरी सर्व्हे केला होता काय?” असा प्रतिप्रश्न त्यांनी संजय राऊतांना केला. तसेच “रिफानरीसंदर्भात आधी राजन साळवी यांचं मन वळवा मग पुढच्या गोष्टी करा. जो विषय राजन साळवींना समजतो तो उद्धव ठाकरें का कळत नाही?” अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.