केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गटाने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. धन्युष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज (मंगळवारी) किंवा उद्या (बुधवारी) सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान काही वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणावर बुधवारीच सुनावणी होणार असल्याचं म्हटलं आहे. असं असतानाच दुसरीकडे ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ ही पर्यायी नावं आयोगानं मंजूर केली आहेत. तसेच ठाकरे गटाला धगधगती मशाल हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया नोंदवली.
नक्की वाचा >> शिवसेना अन् मशाल : १९८५ ला शिवसेनेचा एकमेव आमदार मशाल चिन्हावरच निवडून आलेला; आमदाराचं नाव वाचून वाटेल आश्चर्य
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा