अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरील हक्कासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती शिंदे गटाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता मोठी घडामोड समोर आली आहे. निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शिवसेना हे नावही वापरता येणार नाही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. याप्रकरणावरती ज्येष्ठ वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपलं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, “अंधेरी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तात्पुरत हे चिन्ह गोठावलं आहे. अर्थात याबाबत अंतिम निर्णय दोन्ही बाजूंचा पूर्ण युक्तीवाद ऐकून निवडणूक आयोग घेईल. मात्र, याविरोधात दोन्ही गटांना सर्वोच्च न्यायालयात जाता येणार आहे.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नावाचाही करता येणार नाही वापर

“ईडी, सीबीआयनंतर आयोगही बेठबिगार…”

याप्रकरणावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. “ईडी, सीबीआयनंतर स्वायंत्त संस्था असलेला निवडणूक आयोगही वेठबिगार झाला आहे. आयोगाकडे कोणतरी तक्रार करत, त्याची माहिती न घेता चार तासात धनुष्यबाण चिन्हाबाबत आदेश दिला जातो. कोणाच्या आदेशानुसार हे सर्व सुरु आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे,” असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adv ujjwal nikam react on ec freezes shivsena bow and arrow sybol for both uddhav thackeray and shinde camp ssa
Show comments