उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९ आमदारांसह राष्ट्रवादीत बंड केल्याने कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार की अजित पवार, कोणाची कायदेशीर मजबूत आहे? अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर वकील असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
असीम सरोदे म्हणाले, “सध्या शरद पवारांच्या बाजूने संविधान आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राजकीय पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी नियुक्त केलेला प्रतोद आणि प्रदेशाध्यक्षांना महत्व आहे.”
हेही वाचा : शरद पवारांची अजित पवारांसह ९ आमदारांच्या शपथविधीला मूकसंमती? रोहित पवार म्हणाले, “त्यांच्या मनात काय, हे…”
“एकनाथ शिंदेंनी राजकारणातील नवीन बेकायदेशीर बाराखडी निर्माण केली आहे. त्याच पावलांवर पाऊल टाकत अजित पवार सत्तेच्या एक पदावर स्थानपन्न झाले आहेत. हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे,” असेही असीम सरोदे यांनी म्हटलं.
हेही वाचा : “अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर…”, शिंदे गटातील नेत्याचं विधान
“अजित पवार आणि शरद पवारांचं भांडण हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण, कायद्याच्या दृष्टीने पाहात, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं एकीकडं पालन होत नाही. एकनाथ शिंदे यांच्यानंतर हा पायंडा पडला आहे. ही घटनाबाह्यता प्रस्थापित होत आहे. तो लोकशाहीला धोका आहे,” अशी चिंता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.