अखेरच्या टप्प्यात बरीच चुरस निर्माण झालेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी अखेर कळवणचे अ‍ॅड. विकास देशमुख यांची अविरोध निवड झाली. यापूर्वी निवडणुकीत अंतिम क्षणी १३ जणांनी दावेदारी केल्यामुळे चांगलीच चुरस निर्माण होऊन अखेर कोणत्याही नावावर एकमत होऊ शकले नव्हते. परिणामी, ती प्रक्रियाच स्थगित करून अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाच्या प्रदेश समितीकडे सोपविण्यात आले. भाजप शहराध्यक्षपद निवडीसाठी सायंकाळी उशिरापर्यंत बराच खल सुरू होता. याआधी काही ना काही कारणामुळे स्थगित ठेवली गेलेली वा पुढे ढकलावी लागलेली भाजप जिल्हाध्यक्षासह शहराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने ही निवडणूक अविरोध करण्यासाठी वरिष्ठांना बरीच धडपड करावी लागली. याआधी जिल्हाध्यक्षपदासाठी १३ जणांनी इच्छा प्रदर्शित केली होती. त्यातील काही जणांनी नंतर माघार घेण्याची तयारी दर्शविली असली तरी काही जणांची दावेदारी कायम होती. निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. संभाजी पगारे यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात झाली. इच्छुकांशी चर्चा करून वरिष्ठांनी एका नावावर एकमत करण्यास सुचविले. बराच वेळ बैठका व चर्चेचे गुऱ्हाळ झाल्यावर अखेर एकमत झाले. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी अ‍ॅड. देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर शहराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. या पदासाठी भाजयुमोचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास फरांदे, माजी शहराध्यक्ष विजय साने आणि विद्यमान शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यात मुख्य चुरस होती. बंद दाराआड रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा