सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान घेतलं जात आहे. या सर्व राज्यांच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. ३ डिसेंबरनंतर देशात कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडेल, अशी शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली आहे. ते संविधान सन्मान महासभेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट उल्लेख न करता जोरदार टीका केली. सध्यात देशात आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजाला एकमेकांच्या विरोधात लढवलं जातं आहे, अशी परिस्थिती आहे. हे थांबवण्याऐवजी खतपाणी घातलं जातं आहे. २००२ मध्ये गोधरा हत्याकांड घडलं, २०२३ मध्ये मणिपूरमध्ये नरसंहार झाला. कदाचित ३ डिसेंबरनंतर देशातील कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार घडण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या, असं सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

हेही वाचा- “छगन भुजबळ पागल झालेल्या माणसासारखं…”, ‘त्या’ आरोपावरून मनोज जरांगेंचा संताप

“जनतेला माझं आवाहन आहे की, देशात भडकवणाऱ्या संघटना बऱ्याच आहेत. जे भडकवणारे नेते आहेत, त्यांना म्हणा… आधी तुमचा मुलगा पुढे करा मग आम्ही पाठीमागे येतो. स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवायचं आणि लोकांना पुढे करायचं. स्वत:ला इजा होऊ द्यायच्या नाहीत, पण दुसऱ्याला इजा होऊ द्यायच्या, अशा भूमिकेपासून आपण सावध राहायला हवं,” असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After 3 december there will be some violence prakash ambedkar statement in sanvidhan sanman mahasabha rmm