लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : अठराव्या लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होताच सोलापुरात सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांसह नेत्यांच्या संपर्क कार्यालयांवरील पक्षाचे ध्वज काढण्यात आले. तर नामफलकांवर कापड झाकण्याची लगबग सुरू झाल्याचे पाहायला मिळाली.
भाजप, काँग्रेस, शिवसेना एकनाथ शिंदे गट, शिवसेना उध्दव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच माकप मनसे आदी विविध पक्ष संघटनांच्या कार्यालयांवर प्रथम दर्शनी पक्षाचे नेत्यांच्या छबी असलेले नामफलकांवर कापड झाकण्यात आले. तर झेंडे काढून घेण्यात आले.
आणखी वाचा- सोलापूरचा तापमानाचा पारा चाळिशी पार
सिध्देश्वर पेठेत जिल्हा परिषद कार्यालयाजवळ असलेल्या काँग्रेस भवनाच्या प्रवेशद्वारावर अस्तित्वात असलेले पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व नेत्यांच्या प्रतिमांसह फलक कापडाने झाकण्यात आले. राजवाडे चौकातील भाजप शहर कार्यालय आणि आमदार विजयकुमार देशमुख संपर्क कार्यालयावरील नामफलक झाकून ठेवण्यात आले असून उंच उभारलेले पक्षाचे ध्वज खाली उतरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयाजवळी पोटफाडी चौकात भाजपचे जिल्हा ग्रामीण कार्यालय आहे. तेथेही नामफलकावर कापड झाकण्यात आले.