माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अलीकडेच सरस्वती देवीविरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. भुजबळांच्या या विधानावरून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणी छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी फोनवरून शिवगीळ आणि धमकी दिल्याचा एका व्यक्तीने केला आहे. याबाबत भुजबळांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी नेमकं काय झालं? याचा खुलासा तक्रारदार व्यक्तीने केला आहे.
तक्रारदार ललित टेकचंदाणी यांनी ‘ट्वीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीला सांगितलं की, छगन भुजबळांनी हिंदू साधू-संतांविरोधात आणि सरस्वती देवी विरोधात भाषण दिलं होतं. मी कट्टर हिंदू आहे, मला या गोष्टीचं खूप दु:ख झालं. हिंदू देव-देवतांवर, पडिंतांवर आणि साधू-संतावर बोलणे, हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. पण मी खूप लहान माणूस आहे. मी काहीच करू शकत नाही? त्यामुळे मी भुजबळांना एक युट्यूब व्हिडीओ फॉरवर्ड केला होता. ज्यामध्या हिंदू देव-देवतांबाबत विश्लेषण करण्यात आलं होतं.
हा व्हिडीओ फॉरवर्ड केल्यानंचतर मला अर्ध्या तासात एक फोन आला. समोरून आई-वडिलांवरून मला शिवीगाळ करण्यात आली. घरात घुसून गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्यामुळे मी फोन कट केला. तीन मिनिटानंतर पुन्हा फोन आला, आमचं दुबई कनेक्शन आहे, तुला दुबईतून ठोकतो, अशी धमकी देण्यात आली. मी पुन्हा फोन कट केला. यानंतर ७ ते ८ मिनिटांनी मला व्हॉट्सअॅपवर २० ते २५ संदेश आले. त्यामध्ये भडव्या तुझा पत्ता दे… तुझं लोकेशन पाठव… तुझ्या घरात घुसून मारू… अशा धमक्या दिल्या होत्या. धमक्या देणारी व्यक्ती भुजबळांचे कार्यकर्ते होते, असंही तक्रारदार ललित टेकचंदाणी यांनी सांगितलं.
हेही वाचा- छगन भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नितेश राणेंचं खोचक ट्वीट, म्हणाले ”आता तुम्हाला सरस्वतीही…”
टेकचंदाणी पुढे म्हणाले की, मी छगन भुजबळांना सांगू इच्छितो की, मी एक कट्टर हिंदू आहे, हिंदू लोकांना मुघलही मिटवू शकले नाहीत. तुम्ही आता म्हातारे झाले आहात. त्यामुळे तुम्ही घरी आराम करा. तुम्ही तुरुंगातही जाऊन आला आहात. खूप भ्रष्टाचारांच्या गुन्ह्यात फसले आहात. हिंदुंना भडकवू नका, हिंदुंच्या मतांवर तुम्ही निवडून आला आहात. उद्योग किंवा व्यवसाय करून तुम्ही पैसे कमवले नाहीत. हिंदुंच्या मतावर तुम्ही पैसे कमावले आहेत. त्यामुळे तुम्ही हिंदुंची माफी मागा. आम्ही आमची तक्रार मागे घेऊ. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.