ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत केलेल्या भाषणामुळे शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यासह इतर काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहीर मेळाव्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्या सुषमा अधारे यांनी शिंदे गटावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेऊन गुन्हा दाखल केल्याप्रकरणी प्रतिक्रिया विचारली असता सुषमा अंधारे म्हणाल्या, “असा गुन्हा दाखल होणं फार स्वाभाविक आहे. यामुळे आम्हाला आश्चर्याचा धक्का वगैरे बसला नाही. पण मी वारंवार सांगतेय की, चितावणीखोर वक्तव्य कशाला म्हणायचं? याची संज्ञा ठरवली पाहिजे.”

हेही वाचा- “ज्यांना उमेदवारी दिली त्यांनाच पळवायचं, हे…” ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीवरून जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला!

“माझ्या माहितीनुसार, भारतीय दंड विधानाच्या १५३ (अ) कलमानुसार, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होणे, म्हणजे चितावणीखोर वक्तव्य असणं. पण आमची सभा ९ तारखेला पार पडली, आज १२ तारीख आहे, त्यामुळे आमच्या वक्तव्यामुळे कुठे दंगल घडली? मग आम्ही चितावणीखोर वक्तव्य केलं, असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा- “बंदुकीचा धाक दाखवत माझ्याविरोधात…” संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

दुसरीकडे सदा सरवणकरांनी दंगल घडवली आणि गोळीबार केला. पण त्यांना तुम्ही सोडून दिलं. प्रकाश सुर्वे म्हणाले हात-पाय तोडा, टेबल जामीन करतो. हा माणूस उघडउघड हात-पाय तोडण्याची भाषा करतो. तरीही हे चितावणीखोर भाषण नाही का? की ते सत्संग होतं? म्हणजेच “तुम करो तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, ऐसा कैसे चलेगा रे दादा… ऐसा नही चलेगा” अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी टोलेबाजी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After fir filed agaisnt her sushma andhare on shinde group sada sarvankar firing rmm