अलिबाग : मुंबईहून घारापूरीला जाणाऱ्या बोटीला झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणाऱ्या बोटींची मेरीटाईम बोर्ड आणि पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा गुरुवारी सुरक्षा तपासणी करण्यात आली. बोटींवर प्रत्येक प्रवाशाला पुरतील येवढे लाईफ जॅकेट्स उपलब्ध आहेत अथवा नाही याची पडताळणी करण्यात आली. जलप्रवास करणाऱ्या बोटींवरील प्रवाश्यांना लाईफ जॅकेट्सची सक्ती करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मेरीटाईम बोर्डाने बोट वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी सायंकाळी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला जाणाऱ्या निलकमल या प्रवासी बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिली. या अपघातानंतर निलकमल बोटीला जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत १३ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. तर ९८ जण जखमी झाले. त्यांना नौदल, तटरक्षक दल, पोलीस आणि मच्छीमार बोटींच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेमुळे जल प्रवासी वाहतुक करणाऱ्या बोटीतील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, बोटींवर पुरेश्या प्रमाणात लाईफ जॅकेट, रिंग बोयाज उपलब्ध नसते. जीर्ण आणि वयोमान झालेल्या बोटींचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करणे, बोटींची वाहतुक करतांना नेमून दिलेल्या मार्गाचा अवलंब न करणे यासाठी मुद्दे प्रकर्षाने समोर आले आहेत.

हेही वाचा…गुहागरात खरे ढेरे महाविद्याल्यातील चार प्राध्यापकांना संस्थेच्या अध्यक्षासह पाच जणांकडून जबरी मारहाण

दरम्यान बुधवारच्या दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणाना जाग आली असून गुरुवारी पोलीस आणि मेरीटाईम बोर्डाकडून गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणाऱ्या बोटींची कसून सुरक्षा तपासणी केली जात होती. प्रत्येक प्रवाश्याला लाईफ जॅकेट घालूनच बोटीत बसण्याच्या सक्ती करण्यात आली होती. बोटींवर पुरेश्या प्रमाणात बचाव सामुग्री असल्याची खात्री केल्यानंतर बोटींना सोडले जात होते. बोट व्यवस्थापनाकडूनही प्रवासी क्षमतेचे काटेकोर पालन सुरू होते.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडीया ते अलिबाग तालुक्यातील मांडवा दरम्यान जलप्रवासी वाहतूक सुरू असते. दररोज साडे तीन ते चार हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी प्रवाश्यांची संख्या आठ ते दहा हजारांपर्यंत वाढते. कोकणातील सर्वाधिक प्रवासी वाहतुक असलेला जलमार्ग म्हणून हा मार्ग ओळखला जातो. त्यामुळे या मार्गावर प्रवाश्यांची विशेष खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा…Vijay Wadettiwar : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, विजय वडेट्टीवार म्हणाले…

मांडवा येथून सुटणाऱ्या प्रत्येक बोटीवर प्रवाश्यांना आजपासून लाईफ जॅकेट घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याच बरोबर मंजूर प्रवासी क्षमतेपेक्षा एकही जास्त प्रवासी वाहतूक होणार नाही याची खात्रीकरूनच बोटी सोडल्या जाणार आहेत. नियमांचे उल्लघन झाल्यास कारवाई केली जाईल अशी ताकीदही देण्यात आली आहे.

आशिष मानकर, बंदर अधिकारी, मांडवा. त्‍या दुर्घटनेच्‍या आठवणी ताज्‍या

बुधवारी मुंबईच्‍या समुद्रात झालेल्‍या बोट दुर्घटनेनंतर अलिबागच्‍या मांडवा जेटीजवळ झालेल्‍या बोटी दुर्घटनेच्‍या आठवणी ताज्‍या झाल्‍या. १४ मार्च २०२० रोजी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया जेटीवरून सुटलेली अजंटा कंपनीची अल फतेह ही बोट मांडवा जेटीजवळ ११.३० वाजण्‍याच्‍या सुमारास बुडाली होती. सुदैवाने पोलीसांची गस्‍तीनौका जवळून जात होती. बुडणारया बोटीवरील प्रवाशांचा आकांत ऐकून ही गस्‍तीनौ‍का तिकडे वळवण्‍यात आली. बोटीवरील पोलीस कर्मचारी आणि जेटीवरील कर्मचारी यांनी मोठया शिताफीने बोटीवरील ८८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते.