मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यात आंदोलने झाली असतानाच आता ब्राह्मण समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले जाणार आहे. 22 जानेवारी रोजी हे आंदोलन केले जाणार असून हे आंदोलन शांततामय मार्गाने केले जाईल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक विश्वजित देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रक काढून 22 जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली. ‘केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत कितपत टिकेल, याबाबतही शंकाच आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजालाही स्वतंत्र आरक्षण द्यावे’, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.

‘आम्ही 22 जानेवारी रोजी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानात शांततामय मार्गाने आंदोलन करणार आहोत’, असे देशपांडे यांनी सांगितले. राज्यातील ब्राह्मण समाजातील मोठा वर्ग हा मागास आहे. त्यांच्याकडे रोजगाराच्या पुरेशा संधी नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.  ब्राह्मण समाजाच्या एकूण 15 मागण्या आहेत. यात धार्मिक विधी करणाऱ्या ब्राह्मणांना महिन्याला पाच हजार रुपयांची पेन्शन द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.  ब्राह्मणांसाठी स्वतंत्र महामंडळ, समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह आणि पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत अशा मागण्याही यात करण्यात आल्या आहेत.