देशात आणि राज्यात काँग्रेस आघाडीचा धुव्वा उडत असताना सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी प्रतिस्पर्ध्यावर ३ लाख ६६ हजार ५९४ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्यांना ५लाख २२ हजार ५३१ मते मिळाली. विजयानंतर‘हा जनतेच्या प्रेमाचा विजय असल्याची प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली.
सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकतर्फी होती.उमेदवारी देण्याच्या मानापमान नाटयावरून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेला पूर्णविराम देत शरद पवारांनी त्यांना पक्षाची उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना व काँग्रेस पक्षाला सोबत घेत प्रचाराचा झंझावात उभा केला आणि विजयश्री खेचून आणली. तुलनेने दुर्बल प्रतिस्पर्धी व पक्षाच्या सहाही आमदारांनी उदयनराजेचे केलेले काम आणि राजघराण्याबददल जनतेत असणारा आदर यामुळे हा विजय सहज शक्य झाला.
उदयनराजेंनी पहिल्या फेरीपासून मताधिक्यात आघाडी घेतली होती. रिंगणात एकूण १८ उमेदवार होते, या वेळी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांना शेवटच्या फेरीअखेर १ लाख ५५ हजार ९३७ मते मिळाली.आम आदमी पक्षाचे राजेंद्र चोरगे यांना ८२ हजार ४८९ तर महायुतीचे अशोक गायकवाड यांना ७१ हजार ८०८, याशिवाय बसपाचे प्रशांत चव्हाण १४ हजार ५२३, अल्ताफ शिकलगार (बहुजन मुक्ती पक्ष ) चंद्रकांत खंडाईत(भारीप बहुजन महासंघ) १२ हजार २७० अपक्ष उमेदवार उमेश वाघमारे ४७११, सागर कदम १० हजार ४७) सुखदेव गावडे (२४३५,) पांडुरंग शिंदे (११ हजार ३०४) , डॉ प्रकाश पवार (२१६४) अभिजित बिचकुल(3644,) अॅड. वर्षां माडगूळकर(९४०७), डॉ विजयसिह पाटील (३६५४) सुभाष शिलवंत(५०७३) सुहास देशमुख(१२ हजार १२२), संदीप माझर( १८ हजार २१५) नोटा (१० हजार ५८९) असे मतदान झाले.
विजयी उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या समर्थकांनी मतदार संघात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. सगळीकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मोदी लाटेतही उदयनराजेंचा साडेतीन लाखांनी विजय
देशात आणि राज्यात काँग्रेस आघाडीचा धुव्वा उडत असताना सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी प्रतिस्पर्ध्यावर ३ लाख ६६ हजार ५९४ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्यांना ५लाख २२ हजार ५३१ मते मिळाली.

First published on: 17-05-2014 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After modi wave udayanraje won three and a half lakh