महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेसला राम राम केला. मी दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन असं अशोक चव्हाण म्हणाले होते. मात्र ते आजच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. आज दुपारी १२ च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आज भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.

Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
maharashtra assembly election 2024 srijaya chavan vs tirupati kadam kondhekar bhokar assembly constituency
लक्षवेधी लढत : मुलीसाठी अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला!
murbad constituency kisan kathore subhash pawar, agri and kunbi
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची
Bhokar Assembly Election 2024 SriJaya Chavan
Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण विरुद्ध तिरुपती कोंढेकरांमध्ये अटीतटीची लढत; भोकरमध्ये कोणाचं पारडं जड?
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून प्रसिद्ध असलेले अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी ही महत्त्वाची घडामोड घडली आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात खिंडार पडायला सुरुवात झाली आहे असंच यामुळे म्हणता येईल.

अशोक चव्हाण यांची कारकीर्द कशी आहे?

अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. शंकरराव चव्हाण यांच्याकडूनच त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. त्यांचे सुपुत्र म्हणून शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा सांभाळण्याच्या अशोक चव्हाण यांनी त्यांच्या परीने पूर्ण प्रयत्न केला. वडील आणि मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याचं शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचं एकमेव उदाहरण आहे.

२८ ऑक्टोबर १९५८ या दिवशी अशोक चव्हाण यांचा जन्म मुंबईत झाला. विज्ञान शाखेत पदवी घेतल्यानंतर त्यांनी एमबीए केलं. १९८५ मध्ये संजय गांधी निराधार योजनेचे नांदेड शहराचे चेअरमन झाले. तिथून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. प्रकाश आंबेडकर यांचा जेव्हा त्यांनी निवडणुकीत पराभव केला तेव्हा अशोक चव्हाण हे अवघ्या ३० वर्षांचे होते. १९८७ ते १९८९ या कालावधीत ते खासदार होते. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. १९८६ ते १९९५ या कालावधीत अशोक चव्हाण हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. १९९९ मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आणि ते निवडूनली आहे. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढता राहिला.

हे पण वाचा- “अशोक चव्हाण लीडर नव्हे डीलर म्हणणाऱ्या फडणवीसांनी आता त्यांच्याशी डील..”, उद्धव ठाकरेंची टीका

अशोक चव्हाण आणि आदर्श घोटाळा

शरद पवार आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात विविध खाती सांभाळल्यानंतर २००८ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. २६/११ चा हल्ला २००८ मध्येच झाला होता. त्यावेळी ताज हॉटेलमध्ये विलासराव देशमुख हे रामगोपाल वर्माला घेऊन गेले होते. ही बाब काँग्रेस हायकमांडला मुळीच पटली नाही. त्यामुळे विलासरावांना खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद मिळालं. त्यांची कामगिरी उत्तम प्रकारे सुरु होती. मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अशोकपर्व नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज देऊन तो खर्च निवडणूक खर्चात दाखवल्याचा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर झाला. तसंच कारगील युद्धातील विधवांसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात नातेवाईकांना आणि आप्तस्वकियांना घरं दिल्याच्या प्रकरणात अशोक चव्हाण यांचं नाव अडकलं आणि त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं.