सातारा : सातारा शहराची लाईफ लाईन असणारा कास तलाव पावसाचा जोर वाढल्यामुळे ओसंडून वाहू लागला. कास धरणाच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले आहे. तलावात आता ०.००५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. कास तलाव भरल्यामुळे सातारकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातारा पालिकेने कास धरणाची १२.४३ मीटर उंची वाढवल्यानंतर काल धरण प्रथमच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. सातारा शहराची२०४० पर्यंतची लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन कास धरणाची उंची १२.४२ मीटर उंची वाढवण्यात आली होती. या कामासाठी तब्बल ६० कोटी रुपये खर्च आला. सातारा शहरासह पठारावरील १५ गावांची तहान हा तलाव भागवत असतो. कास धरणाची भिंत वाढवण्याबरोबर धरणाच्या पिछाडीला पायऱ्यांचे टप्पे करण्यात आले आहेत. सततचा पाऊस, मंद धुके, निसर्गरम्य वातावरण यामुळे कास धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढतच आहे.

आणखी वाचा-Video : किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस, आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

शनिवारी दुपारी साडेबारा वाजता कास धरण ओव्हर फ्लो झाले आहे. तीनच दिवसापूर्वी कास तलावामध्ये ५६ फूट पाणीसाठा झाला होता. पावसाचा जोर कायम राहिल्याने कास धरण भरून वाहू लागले. धरण परिसर हा घळीप्रमाणे असल्यामुळे डोंगरातील ओहोळांचे पाणी खळखळून तलावांमध्ये येत आहे. गेल्या पाच दिवसापासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरण ओसंडून वाहिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After rain increased kas lake was filled with water mrj
Show comments