छत्रपती संभाजीराजे यांचा वाढदिवस मागच्या महिन्यात नाशिकमध्ये साजरा करण्यात आला. त्यावेळी संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यादेखील नाशिकला गेल्या होत्या.त्यावेळी नाशिकच्या काळाराम मंदिरात संयोगीताराजे वेदोक्त मंत्र म्हणू लागल्या. ज्याला तेथील पुजाऱ्याने विरोध केला. यानंतर संयोगीताराजेंनी रामनवमीच्या दिवशीच एक भलीमोठी पोस्ट लिहून या गोष्टीचा निषेध नोंदवला. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडही या प्रकरणात आक्रमक झाले आहेत. काळाराम मंदिरातल्या सनतानी मनुवाद्यांचा माजोरडेपणा समोर आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी?
काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा
छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावल, छत्रपती मुळे मंदिर राहिली त्यानाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही.? त्यांनीं उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेच वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादीआजही छत्रपतींना शुद्र समजतात.बरं झाले हे छत्रपतींच्या वारसांबरोबर झालं.
जे मी सांगत तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात
अजून कुठला पुरावा हवा आजचे छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय? बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो. याच काळाराम मंदिरात २ मार्च १९३० रोजी मंदीर प्रवेशा साठी आंदोलन केले होते. काही सनातनी आजही आमच्या पूर्वजांनी बाबासाहेबांना रोखले होते असे सनातनी धर्म परिषदेत फुशारक्या मारतात. असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केला असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी केला आहे. याबाबत संयोगीताराजे छत्रपती यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला आलेला अनुभव लिहिला आहे. तसंच नाशिकमध्ये महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणून दिले नाहीत असा आरोप केला आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.