उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी आळंदीत झालेल्या एका कार्यक्रमात समर्थ रामदास हे छत्रपती शिवरायांचे गुरु होते. त्यांच्यामुळेच छत्रपती शिवरायांना पुढील कार्य करता आलं असा दावा केला होता. योगी आदित्यनाथ जे बोलले त्यानंतर राज्यभरातल्या शिवप्रेमींकडून संताप व्यक्त झाला. इतकंच नाही तर शरद पवार यांनीही योगी आदित्यनाथ यांनी केलेला हा दावा बरोबर नाही असं म्हटलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु या जिजाऊच होत्या या गोष्टीचा पुनरुच्चार केला. आता उपमुख्यमंत्री आणि शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनीही असेच खडे बोल योगी आदित्यनाथांना सुनावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले अजित पवार?

राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांची जडणघडण केली असं ठामपणे अजित पवार यांनी सांगितलं. शरद पवारांनी जसं योगी आदित्यनाथ यांना खडे बोल सुनावले त्याच पद्धतीने अजित पवार यांनीही ठामपणे ही बाब आपल्या वक्तव्यातून अधोरेखित केली. तसंच योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचं खंडन केलं.

हे पण वाचा- ‘योगी आदित्यनाथ यांचा अभ्यास कमी’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानावरून अजित पवार गटाची टीका

योगी आदित्यनाथ यांनी काय म्हटलं होतं?

“मला आज पावन आळंदी भूमीत येण्याचं भाग्य लाभलं. मी सनातन धर्मासाठी काम करत आलो आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीपुढे मी नतमस्तक आहे. अगदी लहान होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली. तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली आहे.” पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. पुढे ते म्हणाले, याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे” असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते.