शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी मोठं विधान केलं आहे. सहा महिन्यानंतर स्वाभिमानानं तुमचा भास्कर जाधव या भागांत मंत्री म्हणून फिरेल, असा निर्धार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांकडून राजकारणाचा स्तर खाली घसरवण्याचं काम देशपातळीवर सुरू आहे, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
भास्कर जाधव म्हणाले, “ही लढाई आपली, तुमची आणि माझीच आहे. फक्त सहा महिने उरलेत. सहा महिन्यांनी हा भास्कर जाधव या भागात, जिल्ह्यात आणि राज्यात स्वाभिमानानं आणि सन्मानानं मंत्री म्हणून फिरेल. त्यामुळे आजपर्यंत जशी साथ दिली. तशीच साथ द्यावी.”
हेही वाचा : “माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर…”, सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल
“मी जिथे उभा राहील त्याठिकाणी सगळेजण माझ्याविरोधात तुटून पडणार आहेत. मात्र, यांच्याविरोधात कुणीतरी लढलं पाहिजे. कोकणातल्या लाल मातीचा स्वाभिमान वेगळा आहे, हे लक्षात ठेवा,” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.
हेही वाचा : “यांना वाघनखे टोचतात अन् पेंग्विन घेऊन, हे…”, भाजपाची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका
“शिवसेना फोडल्यानंतर भाजपानं सहा ते सात सर्वे केले. सगळ्या सर्वेत मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचे सर्व नगरसेवक निवडून येतील. भाजपाचे फक्त २८ येतील. भाजपाचे शिवसेना धरून ४१ खासदार आहेत. पण, उद्या निवडणूक झाली, तर भाजपाचे सहा ते सात खासदार येतील, असा अहवाल आहे,” असा भास्कर जाधव यांनी सांगितलं.