छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन देखील होताना दिसत आहेत. शिवाय, अनेक नेते मंडळींकडून देखील राज्यपालांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी जळगाव येथे माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

“हे पहा छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत आणि मला जेवढी माहिती होती, जेवढं मी सुरुवातीच्या काळात वाचलं होतं, त्यावरून मला माहीत होतं की समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरू आहेत. मात्र इतिहासातील काही तथ्यं मला लोकानी सांगितली आहेत, तर मी ती तथ्यं पुढे तपासून घेईन.” असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माध्यमांना सांगितलं. ते सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला होता.

Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!

तर, राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले आहे. खासदार उदयनराजे भासले यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याचं म्हटलं आहे. तसेच, राज्यपालांनी ताबडतोब खुलासा करावा अशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मागणी केली आहे.