Sharad Pawar Jalna Visit : जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करुन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. मराठा आंदोलकांचं हे म्हणणं आहे की पोलिसांनी शांततेत आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे पोलिसांचं म्हणणं हे आहे की आधी दगडफेक सुरु झाली त्यामुळे आम्हाला लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी बसची जाळपोळही करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा- VIDEO : “…अन्यथा पोलिसांना बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं”, जालना घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया

शरद पवार यांनी जालन्यातल्या या घटनेनंतर काय निर्णय घेतला?

जालन्यात घडलेल्या या लाठीचार्जच्या घटनेत अनेक आंदोलक आणि नागरिक जखमी झाले आहेत. जालना येथील अंतरवरली सराटी गावात ही घटना घडली. आता शरद पवार या जालना आणि या गावाचा दौरा करणार आहेत आणि जखमींची विचारपूस करणार आहेत. अंबड रुग्णालयात या आंदोलनातले जखमी उपचार घेत आहेत. शरद पवार हे त्यांचीही भेट घेणार आहेत.

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

शरद पवार यांचा हा दौरा नेमका कसा असेल?

सकाळी ११.३० च्या सुमारास शरद पवार छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते १२.३० च्या सुमारास अंबड रुग्णालयाला भेट देतील. तसंच शरद पवार हे वादीगोदरी रुग्णालयातही जाऊन जखमींची विचारपूस करतील. जखमींची विचारपूस करुन झाल्यानंतर शरद पवार हे आंदोलन सुरु असलेल्या अंतरवली सराटी गावाला देखील भेट देणार आहेत. त्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“जालन्यात मराठा आक्रोश मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हे थांबवलं नाही, तर मला त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना धीर द्यावा लागेल.” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, नेमकं काय घडलं? काय आहे हे प्रकरण?

लाठीचार्जची नेमकी घटना काय?

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह दहाजण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. ते शांततेच्या मार्गाने उपोषण आंदोलन करत आहेत. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे मराठा आंदोलकांनी चिंता व्यक्त केली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास गावात पोलीस आले. पोलिसांनी सुरुवातीला आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर मात्र अचानक लाठीचार्ज सुरु झाला. तसंच जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला आणि अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. अशात आता या गावाला शरद पवार भेट देणार आहेत. ते काय बोलणारे याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.

Story img Loader