कोल्हापूर : उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर वादाचे पडसाद उमटत असताना मंगळवारी सतेज पाटील यांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आदर आहे. गादीचा सन्मान कायमच राखणार, असे नमूद करत कालच्या वादावर पडदा टाकला आहे. झाले गेले विसरलो आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांचा पारा चांगलाच चढला होता. रात्री कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. कमालीचे उद्विग्न झालेले आमदार पाटील यांनी आज मात्र भावनांवर नियंत्रण मिळवल्याचे दिसले.

हेही वाचा…पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार उद्धव ठाकरे

सकाळी त्यांनी घटक पक्षांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेला हसतमुखाने सामोरे गेले. यावेळी ते म्हणाले, लोकसभेवेळी इंडिया आघाडीने एकजुटीने प्रयत्न केल्याने यश मिळाले होते. आताही त्यांनी विधानसभेसाठी अशीच मदत करणार असे सांगितले आहे. पुढील दिशा रात्रीपर्यंत स्पष्ट करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…तुरुंगात जाईन, पण ‘लाडकी बहीण’ बंद पडू देणार नाही एकनाथ शिंदे

सतेज पाटील भावूक

एका बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटील चांगलेच भावूक झाले. ते म्हणाले, माझ्या दृष्टीने जीवाभावाचे कार्यकर्ते हीच संपदा आहे. काल मालोजीराजे यांनी माघार घेणार असल्याचे सांगितले. पाच तासांत एक उमेदवारी बदलून दुसरी उमेदवारी दिली आहे. तुम्ही असा निर्णय घेऊ नका, असे सांगूनही अर्ज मागे घेतला. असा निर्णय का घेतला याचे उत्तर माझ्याकडे नाही. अगदी पोरा बाळांची शपथ घेऊन सांगतो, असे म्हणताना त्यांना अश्रू रोखणे कठीण गेले.

Story img Loader