माळशेज घाटात शुक्रवारी पहाटे पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक काही तासांसाठी ठप्प झाली होती. ही वाहतूक सकाळी साडेदहा वाजता सुरळीत करण्यात यश आले. दरम्यान, या घाटात डोंगराला तीन ठिकाणी भेगा पडल्या असून, त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास पुन्हा मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे.
माळशेज घाटात २४ जुलै रोजी मध्यरात्री डोंगराचा कडा कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. ती गुरुवारी सुरळीत झाल्यानंतर लगेचच आधीच्या घटनेजवळ हा प्रकार घडला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक पुन्हा ठप्प झाली. रस्त्याचे काम करण्यासाठी सर्व यंत्रणा घाटात असल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी वेगाने काम करीत पडलेली दरड दूर केली, अशी माहिती मुरबाड येथील राष्ट्रीय महामार्गचे उपअभियंता प्रदीप दळवी यांनी दिली. मागील आठवडय़ात ज्या ठिकाणी डोंगराची शिळा तुटून दरड कोसळली त्याजवळच नवीन धबधबा कोसळत आहे. सततच्या पावसामुळे ही दरड कोसळली आहे, असे दळवी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा