हक्काचे कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. बँकेतील अधिकाऱ्यांनी काँग्रेस संस्कृतीतून बाहेर पडावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पवार यांनी दिला.
पवार यांच्या पुढाकारातून शुक्रवारी भाजपने जागर मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले. या वेळी ते बोलत होते. मुदतीत पीककर्ज मिळत नाही, विम्याच्या रकमांचे वाटप होत नाही, पीककर्जाचे पुनर्गठन होत नाही यास बँक अधिकाऱ्यांची भूमिका कारणीभूत आहे. या पाश्र्वभूमीवर हे जागर आंदोलन आयोजित केल्याचे सांगण्यात आले. आयटीआय चौकातून कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. बँकांच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे शेतकरी वैतागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली. यंदाही पावसाने दडी मारली. परिणामी, शेतकरी प्रचंड आíथक कोंडीत सापडला. बँकासुद्धा क्षुल्लककारणे सांगून शेतकऱ्यांबाबत टोलवाटोलवीचे धोरण अवलंबत आहेत. या पाश्र्वभूमीवर पवार यांनी वेगळी संकल्पना घेऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागर घडवून आणला. माजी आमदार गोिवद केंद्रे, राजेश पवार, अॅड. चतन्यबापू देशमुख, डॉ. अजित गोपछडे, प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अॅड. दिलीप ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. सभेनंतर पवार व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना निवेदन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा