लोकसत्ता वार्ताहर

अकोले : निळवंडे धरणातून सुरू असणारे आवर्तन बंद करण्याचा प्रयत्न आज कालव्याच्या गळतीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी केला. आवर्तन तातडीने बंद करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज ‘निळवंडे चाक बंद’ आंदोलनाची हाक दिली होती. आंदोलनात शेतकरी आज आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुनीता भांगरे व जिल्हा बँक संचालक अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक शेतकऱ्यांनी कालव्याचे चाक बंद करण्याचा प्रयत्न केला. जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हे आंदोलन मागे घेण्यात आले.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?

निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम तालुक्यात निकृष्ट झाले आहे.त्या मुळे आवर्तन सुरू असताना अनेक ठिकाणी कालव्याला गळती लागते.कालव्यातून पाझरणारे, पाणी कालव्या लगतच्या शेतात साठून पिकांचे मोठे नुकसान होते.कालव्याच्या जवळ असणाऱ्या काही घरांमध्ये हे पाणी शिरते. रस्ते पाण्यात जातात.कालव्या लगतच्या शेतकऱ्यांना आवर्तनाचा मोठा त्रास सहन करावा लागतो.मागील दोन आवर्तनाचे वेळी शेतकऱ्यांनी या प्रश्नी आंदोलने केली.त्यांना काही आश्वासने देण्यात आली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.

आणखी वाचा-शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झालेला असताना कृषीमंत्री परळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न, छत्रपती संभाजीराजे यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका

गत महिना भरापासून निळवंडे चे आवर्तन सुरू आहे.कालव्यातून गळणाऱ्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साठवून पिकांचे नुकसान झाले आहे.मशागतीची कामे करता येणे अश्यक्य बनले.महिनाभरापासून निळवंडे चे सुरू असणारे आवर्तन तातडीने बंद करावे या साठी आज चाक बंद आंदोलन छेडण्यात आले होते.या साठी महिला तसेच शेतकरी मोठया संख्येने जमा झाले होते.जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आश्वासने दिली.

पण त्या मुळे कोणाचेच समाधान झाले नाही.उलट आंदोलक अधिक आक्रमक बनले व कालव्याचे चाक बंद करण्याचा निर्धाराने सिंचन विमोचकाकडे गेले.विमोचन नियंत्रण कक्षाला कुलूप असल्यामुळे तसेच पोलीस बंदोबस्ता मुळे त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.या वेळी एका आंदोलकाने कुलूप तोडण्यासाठी मोठा दगडही उचलला होता.मात्र पुढील अनर्थ घडला नाही.

आणखी वाचा- पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने बंधार्‍यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा दुर्दैवी मृत्यू

आश्वासनापूर्ती न करणाऱ्या जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना या वेळी आंदोलकांनी चांगलेच धारेवर धरले.आवर्तन तातडीने बंद करा या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरू होती.आंदोलनाकडे पाठ फिरविणाऱ्या तालुक्याच्या आमदारांचा तसेच जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. वरिष्ठां बरोबर संपर्क करून जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी मागील दोन आवर्तनात झालेल्या नुकसानीची भरपाई ३१ ऑक्टोबर पूर्वी दिली जाईल,आवर्तनाचा कालावधी कमी करून २० सप्टेंबर ला आवर्तन बंद केले जाईल तसेच निंब्रळ, निळवंडे, मेहंदूरी, सुल्तानपूर, कळस या गावातील अति गळती होत असणाऱ्या ठिकाणी अस्तरीकरण,कॉक्रिटिकरणा चे काम पुढील आवर्तना पूर्वी पूर्ण केले जाईल या दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन संपविण्यात आले.आश्वासना प्रमाणे २० सप्टेंबर ला आवर्तन बंद न झाल्यास जलसंपदाच्या कार्यल्यावर मोर्चा नेण्याचा इशारा अमित भांगरे यांनी दिला आहे.