पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया या खाजगी साखर कारखान्यात विरोधात ऊसदरासाठी जय शिवराय शेतकरी संघटनेने सोमवारी आंदोलन सुरू केले.दत्त दालमिया शुगर (आसुर्ले पोर्ले) या कारखान्याने एमआरपी पेक्षा पहिली उचल कमी जाहीर करून कारखाना सुरू केलेला आहे. मागील हंगामातील आरएसएस (महसुली विभागणी) नुसार हिशोब देऊन ती रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्व साखर कारखान्यांपेक्षा तोडणी – वाहतूक खर्चही १२५ ते १५० रुपयांनी ज्यादा दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे.

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांना टोल माफी दिली जाते मग आम्हाला….”, स्वाभिमानी संघटना आक्रमक

यातून त्यांनी मागील गळीत हंगामामध्ये सुमारे १४ कोटी रुपयांची लूट केलेली आहे. आदी मागण्या संदर्भात दत्त दालमिया कारखान्याच्या गेट समोर जय शिवराय किसान संघटनेने वतीने आंदोलन सुरू केले.आज दुपारपर्यंत या मागण्यांचा विचार करून, प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले नाही, तर दत्त दालमिया कारखान्याची संपूर्ण ऊस वाहने रोखून धरण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला.यावेळी दत्ता पाटील, युवराज आडनाईक, कुलकर्णी काका, गुणाजी शेलार, बंडा पाटील, प्रताप चव्हाण, तातोबा कोळी , नामदेव पाटील, सर्जेराव गायकवाड, गब्बर पाटील,आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Story img Loader