नाशिकमध्ये स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने सुशोभिकरणाच्या नावाखाली रामकुंड परिसरात केलेली तोडफोड याविरोधात नाशिककर आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत शनिवारी गोदाकाठावर सत्याग्रह आंदोलन केले. याबाबत स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आठ दिवसात या मागण्यांविषयी गोदाकाठावर प्रत्यक्ष चर्चा करण्याचे त्यांनी मान्य केले.

हेही वाचा- ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
medha Patkar
समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत
Ramshej Fort Conservation, Shivkarya Gadkot Sanstha Campaign, Ramshej Fort,
नाशिक : रामशेज किल्ला संवर्धनार्थ अशी ही धडपड, शिवकार्य गडकोट संस्थेची श्रमदान मोहीम
nashik hindu organization protest march
नाशिक : युवक मारहाणीच्या निषेधार्थ पिंपळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

महानगर पालिकेतंर्गत सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांच्या विरोधात पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला आहे. रामकुंड परिसरात मार्चमध्ये पायऱ्यांची तोडफोड झाली. हे काम थांबविण्यात आले होेते. पुरातत्व विभागाच्यावतीने आक्षेप घेत स्मार्ट सिटीला पत्र पाठविण्यात आले. परिसरात स्मार्ट सिटीच्यावतीने विना परवानगी कामे केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. सुशोभिकरणाच्या नावाखाली ऐतिहासिक ठेव्याशी छेढखानी होत असल्याने स्थानिकही संतप्त झाले आहेत. एकच ध्यास मोकळा व्हावा गोदावरीचा श्वास असे म्हणत स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात गोदावरी प्रेमींसह नाशिककरांनी शनिवारी सत्याग्रह आंदोलन केले.

हेही वाचा- मनमाडमधून २४ तलवारींचा साठा जप्त; दोन जण ताब्यात

कंपनीने केलेल्या मनमानी कारभाराचा यावेळी पाढा वाचण्यात आला. नीळकंठेश्वर महादेव मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित वास्तू असतांना या ठिकाणी परवानगी न घेता कंपनीकडून कामाला सुरूवात झाली. २०२० मध्ये गोदापात्रातील दगडी देवीजवळील सांडवा तोडण्यात आला, यशवंतराव चव्हाण पटांगण परिसर प्रतिबंधित क्षेत्र असतांना या ठिकाणी फरशा बसविण्याचे काम सुरू आहे. नदीच्या मूळ रुपाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका स्थानिकांसह आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तसेच कंपनीने तोडलेला गोदावरी नदीपात्रातील देवीचा सांडवा पूर्ववत बांधण्यात यावा, यशवंतराव महाराज पटांगण येथे तोडलेल्या पायऱ्या पुरातन पध्दतीने बसवून द्याव्यात, कंपनीकडून गणपतीची मूर्ती विधीवत बसविण्यात यावी, सांडवा तोडतांना ज्या मंदिराना भेगा गेल्या त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात देवांग जानी, अनिकेतशास्त्री महंत, रामसिंग बावरी आदींसह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक उपस्थित होते.

हेही वाचा- ‘सीमावादावर मुख्यमंत्री गप्प का?’; बाळासाहेब थोरात यांचा प्रश्न

खुल्या चर्चेची अपेक्षा

स्मार्ट सिटी कंपनीकडे याआधी गोदाकाठावरील तोडफोड, विद्रुपीकरणाविषयी निवेदन देत मंदिर किंवा अन्य तोडफोड याविषयी विचारणा केली होती. पुरातत्व विभागाकडून तक्रार करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी कंपनीच्या वतीने सांडवा तोडल्यामुळे ज्या मंदिरांना भेगा गेल्या, ती दुरूस्त करण्यात यावी, यासह इतर मागण्या मान्य करण्यात आल्या. परंतु, सांडव्याची देवीसह अन्य मागण्यांचा त्यात उल्लेख नव्हता. शनिवारी आंदोलनानंतर अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सर्वांची एकत्र बैठक कंपनी कार्यालयात घेऊ, त्यावर तोडगा काढु, असे आश्वासन दिले. मात्र मागण्यांविषयी प्रत्यक्ष गोदाकाठ परिसरात खुलेआम चर्चा व्हावी, हे काम किती दिवसात कसे करणार, हे लेखी मागितले आहे. या संदर्भात पुढील आठ दिवसात अधिकाऱ्यांसोबत एकत्र बैठक होईल, अशी माहिती गोदाप्रेमी नाशिककर देवांग जानी यांनी दिली.

Story img Loader